मृणालला वाटते 'या' गोष्टीची भीती

मृणालला वाटते 'या' गोष्टीची भीती

मुंबई : ‘तू तिथे मी’ ही मालिका करत असताना माझी पहिली कार टाटा कंपनीची मांजा मी विकत घेतली. मी मूळची नाशिकची. त्यामुळे मला मुंबईत राहण्याची किंवा मुंबईतल्या प्रवासाची सवय नव्हती. मुंबईत आल्यानंतर लोकल, बस, रिक्षा यांनी प्रवास केला आहे. पण चित्रपटसृष्टीत काम करत असताना वेळेचे बंधन राहत नाही, अगदी १६ तास काम करावे लागते. हे वेळेचं गणित सुरुवातीला मला माहीत नव्हतं, मात्र जसजशी मी चित्रपटसृष्टीत रमत गेले तसतशी मला स्वतःची कार असावी, असे वाटू लागले. 

महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच मी गाडी चालवायला शिकले. त्यासाठी क्‍लासेसही लावले होते. माझ्या बाबांची कार होती, ती मी अधूनमधून चालवायचे. त्यामुळे माझ्याकडे गाडी येण्याआधीच गाडी चालवायला यायची. महत्त्वाचे म्हणजे माझ्याकडे दुचाकी, चारचाकी गाडीसोबतच ट्रक चालवायचाही परवाना आहे. गाडी चालवायला जरी मला आवडत असले तरी मी आता गाडी चालवत नाही. काही वर्षांपूर्वी माझ्या गाडीचा अपघात झाला होता आणि त्यात मला गंभीर दुखापत झाली होती, त्या दिवशीपासून गाडी चालवण्याची भीती माझ्या मनात घर करून बसली आणि त्या दिवसापासून अगदी आजपर्यंत मी गाडी स्वतःच्या हातातही घेतली नाही.

आता मी ड्रायव्हर ठेवला आहे. माझ्या या कारला आता सात ते आठ वर्षे झाली आहेत. मी ज्या दिवशी माझी गाडी घेतली त्या दिवशी माझ्या कुटुंबीयांसोबत मी महाबळेश्‍वरला फिरायला गेले होते. संपूर्ण महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राबाहेरही मी माझी गाडी घेऊन गेले आहे. बराच लांबचा प्रवास मी माझ्या गाडीसोबत केला आहे. आता माझी कलर्स मराठी वाहिनीवर ‘हे मन बावरे’ ही मालिका सुरू आहे आणि या मालिकेच्या चित्रीकरणालाही मी कारच घेऊन जाते. माझी ड्रीम कार बीएमडब्ल्यू आहे, आणि ती कार मला घ्यायला नक्की आवडेल. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com