Mrunal Thakur : मराठमोळी मृणाल अवतरली कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर

कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023 मध्ये मराठमोळ्या मृणाल ठाकूरच्या लुकचीच सगळीकडे चर्चा
Mrunal Thakur
Mrunal Thakur esakal

Mrunal Thakur : कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023 मध्ये मराठमोळ्या मृणाल ठाकूरच्या लुकचीच सगळीकडे चर्चा आहे. पहिल्यांदाच भारताकडून मृणाल गेली आहे. आतापर्यंत ऐश्वर्या, दीपिका आणि प्रियांकाचीच चर्चा होती. मात्र आपल्या लुकमुळे आणि आत्मविश्वासामुळे मृणालच्या लुकने सर्वांना तिच्याकडे पाहायला भाग पाडले आहे. तिसऱ्या दिवशीचा मृणालचा लुक पाहिलात का? तुमचा श्वासच रोखला जाईल.

Mrunal Thakur
Car Black Film Windows : बंदी असतानाही गाड्यांच्या काचांवर ब्लॅक फिल्म लावता येते का? नियम काय सांगतो

आयव्हरी ह्यू रिस्क कट गाऊन

मृणालने तिसऱ्या दिवसासाठी रेड कार्पेटवर डिझाईनर फाल्गुनी पिकॉक कलेक्शनमधील कट आऊट ड्रिमी गाऊन घातलेला दिसून आला.

लाँग ट्रेल फिदर गाऊन

मृणालने घातलेला हा कट गाऊन अत्यंत युनिक डिझाईनचा असून पुढून आणि मागून अत्यंत लांबसडक पिसांप्रमाणे डिझाईन असून त्यामध्ये सिक्विन लुक देण्यात आला होता.

ओव्हरसाईज डायमंड कानातले

या ड्रेससह मृणालने स्पार्कल आणि डॅझलिंग असे हिऱ्यांचे कानातले मोठ्या आकाराचे घातले जे सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.

सॉफ्ट मेकअप

मृणालचा मेकअप अत्यंत सॉफ्ट आणि न्यूड होता. ब्लश्ड चिक्स, आयलायनरचा अत्यंत बारीक स्ट्रोक, न्यूड पिंक लिपस्टीक तिने लावली होती.

Mrunal Thakur
Travel Story : हनिमूनसाठी भारतातील स्वस्तात मस्त ठिकाणे

मस्कारा आणि आयशॅडो

मस्कारा आयलॅशेस आणि आयशॅडोनेदेखील मृणालने लक्ष वेधून घेतले. अत्यंत सुंदर आणि आकर्षक दिसत होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com