Mrunal Thakur marriage: मृणाल लग्नासाठी तयार! तेलगू अभिनेत्यासोबत अडकणार लग्नबंधनात?

Mrunal Thakur marriage
Mrunal Thakur marriageEsakal

Mrunal Thakur To Tie The Knot With A Telugu Actor?: बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकुर ही नेहमी सध्या तिच्या ऑख मिचोली या चित्रपटामुळे चर्चेत आहे. यासोबतच ती तिच्या साउथ चित्रपटामुळे देखील चर्चेत असते. टिव्ही मालिकांपासून सुरुवात करणारी मृणाल आता हिंदी आणि साउथ चित्रपटांसोबत ओटीटीवरही तितकीच लोकप्रिय झाली आहे.

ती ओटीटीवरील 'लस्ट स्टोरीज'च्या सीझनमध्ये दिसली होती. आता तिचा आँख मिचोली हा सिनेमा रिलिज झाला आहे. तर आता दुसरीकडे मृणाल तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.

Mrunal Thakur marriage
Tiger 3 New Promo: सलमानच्या टायगरचा दरारा असा की सेन्सॉर बोर्डाकडून झिरो कट्स! नवीन प्रोमोही आला भेटीला

मृणाल ठाकुर लवकरच लग्न करणार असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे की आहे. मणाल गेल्या काही दिवसांपासून तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत होती. मृणाल एका तेलगू अभिनेत्याच्या प्रेमात असून ती लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. असा दावा केला जात आहे.

अलीकडेच एका कार्यक्रमादरम्यान, ज्येष्ठ चित्रपट निर्माते अल्लू अरविंद यांनी मृणाल ठाकूरला सर्वोत्कृष्ट फिमेल अभिनेत्रींचा पुरस्कार दिला. त्याचबरोबर तिने लवकरच लग्न करावे म्हणुन आशिर्वादही दिला. तेव्हापासूनच मृणालच्या लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.

Mrunal Thakur marriage
Elvish Yadav FIR: बिग बॉस जिंकल्यापासून ते FIR दाखल होईपर्यंत; चर्चेत आलेला एल्विश आहे तरी कोण?

त्याचबरोबर मृणालने इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत तिच्या लग्नाबद्दल खुलासा करताना सांगितले होते की, 'माझा लग्नावर विश्वास आहे, मी माझ्या आजूबाजूला अनेक असे यशस्वी विवाह पाहिले आहेत जे एकमेकांसाठी बनलेले आहेत. आपल्याला फक्त ही गोष्टी माहित पाहिजे की आपण ज्या व्यक्तीसोबकत लग्न करत आहोत ती आपल्यासाठीच आहे. आता तुम्ही 18, 20किंवा तुमच्या 30, 40, 50 वर्षी या व्यक्तीला शोधू शकता.'

Mrunal Thakur marriage
Kangana Ranaut:...तर मी निवडणूक लढवणार, कंगनानं दिले लोकसभा निवडणूकीचे संकेत

मात्र आता मृणाल अनेक दिवसांपासून एका साऊथ अभिनेत्याला डेट करत असून हे दोघेही लग्नाचे प्लॅनिंग करत असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र मृणाल कुणाल डेट करत आहे याचा खुलासा अद्याप झालेला नाही. त्यामुळे आता मृणालने लवकरच या बातमीचा खुलासा करावा आणि चाहत्यांना गुडन्यूज द्यावी अशी आशा तिचे चाहते करत होते, मात्र नंतर मृणालने तिच्या सोशल मिडियावर पोस्ट शेयर करत या बातमीचे खंडन केले आहे. ती लग्न करत नसून या सर्व केवळ अफवा असल्याचं तिने शेयर केलेल्या व्हिडिओत म्हटले आहे.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती ‘हे नाना’ आणि ‘फॅमिली स्टार’ या चित्रपटात दिसणार आहे. हे दोन्ही चित्रपट तमिळ, तेलगू आणि हिंदीसह अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com