MS World 2022: हरियाणाची प्रियंका जुनैजा ठरली 'मिसेस विश्वसुंदरी'|MS United nations world 2022 Priyanka Juneja | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MS United nations world 2022 Priyanka Juneja

MS World 2022: हरियाणाची प्रियंका जुनैजा ठरली 'मिसेस विश्वसुंदरी'

MS United Nations World 2022: विश्वसुंदरीच्या नावाबद्दल अनेकांच्या मनात कुतूहल असते. ही स्पर्धी जिंकणं हे अनेक तरुणींच स्वप्न असतं. गेल्या (Miss Universe 2022) अनेक वर्षांपासून भारतामध्ये या स्पर्धेविषयीची मोठी क्रेझ तयार झाली आहे. भारतानं आतापर्यत या स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी केली (Miss World) आहे. आता पुन्हा समस्त भारतीयांसाठी एक गोड बातमी समोर आली आहे. ती म्हणजे हरियाणाच्या प्रियंका जुनैजा मिसेस विश्वसुंदरी 2022 (Priyanka Juneja 2022) होण्याचा मान पटकावला आहे. 1 ते 7 मे कालावधीत एमएस युनाटेड नेशन्स वर्ल्ड 2022 स्पर्धा पार पडली होती. त्यामध्ये प्रियंकानं विश्वसुंदरीचा मुकूट आपल्या नावावर केला आहे. तिनं त्या स्पर्धेमध्ये बाजी मारल्याचे कळताच सोशल मीडियावरुन तिच्यावरुन कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे.

युनाटेड स्टेट्समध्ये झालेल्या या स्पर्धेमध्ये 62 देशांतील तरुणींनी सहभाग घेतला होता. मात्र भारताच्या प्रियंकानं सर्वांना मागे टाकत यशस्वी कामगिरी केली आहे. सात फेऱ्यांमध्ये झालेल्या या स्पर्धेमध्ये प्रियंकानं पहिल्यापासून परिक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. तिला विचारण्यात आलेल्या प्रश्नांना तिनं प्रभावीपणे उत्तरं दिलं. स्पोर्टस, टॅलेंट, हाय फॅशन, रँप वॉक, पर्सनल इंटरव्ह्यु, सोशल वर्क यासारख्या मुद्दयांवर स्पर्धकांना प्रश्न विचारण्यात आले होते. प्रियंकाला 40 मिनिटांपर्यत मुलाखत द्यावी लागली. त्यातून तिनं परिक्षकांना प्रभावित केले.

हेही वाचा: 'विक्रम'चा ट्रेलर पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, बॉलीवूड म्हणजे...

मुलाखतीच्या दरम्यान तिला जे प्रश्न विचारण्यात आले त्याला प्रियंकानं जागतिक परिस्थितीला सामोरं ठेवून उत्तरं दिलं. त्यामुळे परिक्षक प्रभावित झाल्याचे सांगण्यात आले आहे. तिला युक्रेन आणि रशियाच्या युद्धावरुन प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ती म्हणाली, मला कोणत्याही देशाची बाजु घ्यायची नाही तर मी माणुसकीच्या बाजुनं आहे. तिला दुसरा प्रश्न हा ग्लोबल वॉर्मिंगचा विचारण्यात आला होता. त्यावर ती म्हणाली, आपण नेहमी ग्लोबल वॉर्मिंगविषयी मोठ्या प्रमाणावर चर्चा करतो. पण आता वेळ आली आहे ती स्वतापासून सुरुवात करण्याची. तसे झाल्यास प्रत्येकजण त्याचा गांभीर्यानें विचार करेल. पहिलं पाऊल स्वताने टाकलं तर त्याचा फायदा होईल. असं उत्तर प्रियंकानं दिलं होतं.

हेही वाचा: बॉलीवूड दिग्दर्शकावर FIR, अमित शाह यांचा 'तो' फोटो व्हायरल करणं पडलं महागात

Web Title: Ms United Nations World 2022 Priyanka Juneja Wins Beauty Title Social Media Viral News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top