'विक्रम'चा ट्रेलर पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, बॉलीवूड म्हणजे...

टॉलीवूडच्या चित्रपटांनी गेल्या काही दिवसांपासुन कमाल केली आहे. त्याला मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसादही जोरदार आहे.
Vikram Movie Trailer Viral
Vikram Movie Trailer Viral esakal

Tollywood News: टॉलीवूडच्या चित्रपटांनी गेल्या काही दिवसांपासुन कमाल केली आहे. त्याला मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसादही जोरदार आहे. गेल्या वर्षी अल्लु (Pushpa Movie) अर्जुनच्या पुष्पानं जी जोरदार सुरुवात केली ती यावर्षीच्या यशच्या केजीएफनं धुमाकूळ घातला आहे. एस एस राजामौली यांच्या (RRR Movie) आरआरआरनं देखील बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली आहे. बाहुबलीनंतर सर्वाधिक कमाईचा रेकॉर्ड आरआरआरनं आपल्या नावावर केला (Social media) आहे. येत्या काळात देखील जबरदस्त अॅक्शन मुव्ही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या एका चित्रपटाच्या ट्रेलरनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. 24 तासांपूर्वीच या चित्रपटाच्या ट्रेलरनं तब्बल दोन कोटी व्ह्युजची संख्या पार (Vikram Trailer) केल्याचे दिसून आले आहे. त्या ट्रेलरला प्रेक्षकांनी भन्नाट कमेंटसही दिल्या आहेत.

दाक्षिणात्य चित्रपट विश्वातील प्रसिद्ध अभिनेते कमल हासन, विजय सेतुपती, फरहाद फासिल यांच्या दमदार भूमिका असलेल्या विक्रमच्या ट्रेलरनं प्रेक्षकांना जिंकुन घेतले आहे. असा ट्रेलर पाहिल्यानंतर बॉलीवूडच्या चित्रपटांना काय म्हणाल अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आणि प्रश्न नेटकरी सोशल मीडियावरुन विचारु लागले आहे. या चित्रपटातील कमल हासन यांच्या एका गाण्यावर आक्षेप घेण्यात आला होता. ते गाणं दुसऱ्या एका गाण्याची कॉपी असल्याचा आरोप कमल हासन यांच्यावर करण्यात आला होता. या तीनही प्रसिद्ध अभिनेत्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांनी जबरदस्त प्रतिसाद दिला आहे. त्यातील संगीत, संवाद, कॅमेरा, एडिटिंग, ग्राफिक्स हे सारं थक्क करणारं आहे. साधारण अडीच ते तीन मिनिटांच्या ट्रेलरमधून साऊथ फिल्म इंडस्ट्रीला गेल्या काही महिन्यांपासून का प्रतिसाद मिळतो आहे. याचे उत्तर पाहायला मिळेल.

Vikram Movie Trailer Viral
Bollywood V/S South : तुला साऊथचे चित्रपट आवडतात का? रणवीर सिंगचं कडक उत्तर

लोकेश नागराज दिग्दर्शित हा चित्रपट तीन जुनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एकीकडे टॉलीवूड विरुद्ध बॉलीवूड असा लढा सुरु असताना टॉलीवूडच्या दिग्दर्शकांकडून येणाऱ्या वेगवेगळ्या कलाकृतींना मिळणारा प्रतिसाद मोठ्या प्रमाणावर दिसून आला आहे. यापूर्वी विक्रमच्या पहिल्या गाण्याला देखील प्रेक्षकांनी मोठी दाद दिली होती. 2022 वर्षातील सर्वात लक्षवेधी फिल्म म्हणून विक्रमच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. हा चित्रपट वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये आठ प्रख्यात अभिनेत्यांचा समावेश नागार्जुननं केला आहे. विक्रमचा ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी बॉलीवूड आणि टॉलीवूड अशी तुलना केली आहे. असा ट्रेलर असल्यावर बॉलीवूडच्या वाट्याला कोण जाणार असा प्रश्नही विचारला आहे.

Vikram Movie Trailer Viral
Bollywood Top 10 : अमिताभ, शाहरुख, सलमान कोणीच नाही! आहे तरी कोण?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com