‘पुण्यावर पुन्हा एकदा एक भयंकर संकट कोसळलंय’; मुक्ता बर्वेची पोस्ट चर्चेत Mukta Barve | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mukta Barve Post about Pune city

‘पुण्यावर पुन्हा एकदा एक भयंकर संकट कोसळलंय’; मुक्ता बर्वेची पोस्ट चर्चेत

अभिनेत्री मुक्ता बर्वेने (Mukta Barve) मागील अनेक वर्षापासून मालिका, चित्रपट आणि नाटक या माध्यमातून आपले दमदार अभिनय कौशल्याद्वारे प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. त्यानंतर आता मुक्ता आपल्या अभिनयासोबत आपल्या आवाजाच्या जादूनेही प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. कथावर्णन करत ती एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर आली आहे. काही दिवसापूर्वी 'स्टोरीटेल' मराठीवर तिची ‘Virus -पुणे’ (Pune) ही एक सीरिज आली होती. आता याचा दुसरा भाग ‘Virus -२ पुणे' घेऊन ती आपल्या भेटीला आली आहे. नुकतीच तिनं याची माहिती देणारी एक पोस्ट केली आहे. सध्या मुक्ताची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.

हेही वाचा: KGF 2 : सिनेमाचा एडिटर आहे 19 वर्षीय मराठी मुलगा; कोण आहे उज्जवल कुलकर्णी?

एका जीवघेण्या व्हायरसच्या निमित्तानं पुण्यावर एक भयंकर संकट कोसळलंय. सगळं शहर पत्त्यांसारखं उन्मळून पडत असताना नेहाच्या मुलीला मायराला काही अज्ञात लोकांनी किडनॅप केलंय. मायरापर्यंत पोचण्यात, तिचा शोध घेण्यात नेहा, दिव्या, सचिन यशस्वी होतील? न भूतो न भविष्यती अशा या संकटातून ते खरंच बाहेर पडतील? नियतीचा हा जीवघेणा खेळ खरंच संपेल? ‘Virus -२ पुणे' या स्टोरीटेल मराठी वरील ऑडिओ सिरीज विषयीची ही तिची पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. चाहते देखीलत मुक्ताच्या या नवीन सीरिजबद्दल विशेष उत्साही आहेत.

Mukta Barve New audio series image

Mukta Barve New audio series image

‘Virus- पुणे’ या मुक्ताच्या सीरीजच्या पहिल्या सिजनला कमाल लोकप्रियता मिळाली होती आणि त्यामुळे दुसऱ्या सीजनची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. मुक्ताच्या दुसऱ्या सिझनला स्टोरीटेलवर अद्भुत असा प्रतिसाद मिळत असून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. यापूर्वी आलेल्या मुक्ताच्या‘अॅडिक्ट’ या पहिल्या सीरिजलाही प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला होता. यामध्ये डॉ. रक्षा नावाच्या एका महिलेची ती गोष्ट सांगण्यात आली होती. जिच्या आयुष्यात ती अशा एका घटनेला सामोरे जाते त्यानंतर त्याचे तिला व्यसन लागते. मात्र, हे काही ड्रग्ज, अल्कोहोल इत्यादींचे व्यसन नाही. तिच्या या विचित्र व्यसनामुळे तिचे आयुष्य रंजक आणि भयानक वळण घेते.

हेही वाचा: LockUpp: कंगनाच्या 'या' कैद्याचं नशीब फळफळलं;रोहित शेट्टीशी जोडलं जातंय नाव

तीन ते चार वर्षापूर्वी डॅनियल ॲाबर्ग यांनी प्रथम 'Virus - Stockholm' स्विडीश भाषेत लिहीली. त्यावेळी ती एक परिपूर्ण Sci-Fi सिरीज होती, पण दोन वर्षांपूर्वी कथेतला काही अंश थेट वास्तवातच आला आणि पहिल्यांदाच Sci-fi genre ची भिती वाटली. त्यामुळे ही सिरीज मराठी भाषेत आली पाहिजे असं 'स्टोरीटेल मराठी'ला प्रकर्षाने जाणवलं. आठ ते नऊ महिन्याच्या मेहनतीनंतर डिसेंबर २०२२ ला पहिल्यांदा 'Virus-पुणे' स्टोरीटेलवर रिलीज झाली. निरंजन मेढेकरांनीनी लिलया पेलत आणि मोहिनी वाघेश्वरी यांनी काटेकोरपणे स्क्रिप्टवर काम करून प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारं लिखाण केलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुक्ता बर्वेने दिलेलं नॅरेशन. मुक्ताच्या आवाजामुळे ही सिरीज आपण ऐकत नसून हे सर्व आपल्या आजूबाजूला घडतंय असं जाणवतं".

हेही वाचा: 'मी तर वेलचीची जाहिरात...' अक्षयच्या माफीनाम्यानंतर अजय देवगणची सारवासारव

'Virus - Stockholm' च्या मराठी भावानुवादावर या मूळ कथेचा लेखक डॅनियल भलताच खुश आहे. त्याला मराठीतील हे सादरीकरण प्रचंड आवडलं आहे आणि विशेष म्हणजे मुक्ता बर्वेच्या दमदार आवाजातील चित्तथरारक ऐकून तो तिचा जबरदस्त फॅन झाला आहे.

Web Title: Mukta Barve Post About Pune City Is This A Promotion Of Her New Film Read Details

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top