मुक्ता बर्वे होणार रेडिओ जॉकी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालणारी मुक्ता बर्वे आता लवकरच तिच्या चाहत्यांना एका वेगळ्या रूपात दिसणार आहे. "द मुक्ता बर्वे' नावाने येणाऱ्या शोमध्ये ती चक्क "रेडिओ जॉकी' बनणार आहे. बदलता समाज आणि परिस्थितीनुरूप "स्त्री'ची व्याप्ती वाढत चालली आहे. स्त्रीच्या विश्‍वाचा वेध "माय एफएम'च्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. त्या शोचे नाव आहे "द मुक्ता बर्वे.' मुक्ता बर्वे त्याचे सूत्रसंचालन करणार आहे. तिच्या चाहत्यांना ती आता रेडिओ जॉकीच्या रूपात दिसणार आहे. विशेष म्हणजे एका सेलिब्रिटीद्वारे जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्याचा पहिलाच प्रयोग "माय एफएम' रेडिओ वाहिनीमार्फत राबविला जात आहे.

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालणारी मुक्ता बर्वे आता लवकरच तिच्या चाहत्यांना एका वेगळ्या रूपात दिसणार आहे. "द मुक्ता बर्वे' नावाने येणाऱ्या शोमध्ये ती चक्क "रेडिओ जॉकी' बनणार आहे. बदलता समाज आणि परिस्थितीनुरूप "स्त्री'ची व्याप्ती वाढत चालली आहे. स्त्रीच्या विश्‍वाचा वेध "माय एफएम'च्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. त्या शोचे नाव आहे "द मुक्ता बर्वे.' मुक्ता बर्वे त्याचे सूत्रसंचालन करणार आहे. तिच्या चाहत्यांना ती आता रेडिओ जॉकीच्या रूपात दिसणार आहे. विशेष म्हणजे एका सेलिब्रिटीद्वारे जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्याचा पहिलाच प्रयोग "माय एफएम' रेडिओ वाहिनीमार्फत राबविला जात आहे. सोमवार ते शनिवारी दुपारी 12 वाजता मुक्ताच्या आवाजातला हा शो पश्‍चिम महाराष्ट्रात सुरू होत आहे. मुक्ता बर्वे आमच्या कार्यक्रमाला चांगला न्याय देऊ शकेल, असा विश्‍वास "माय एफएम'ला असून, तो स्त्री विकासावर आधारित असल्याचे ते सांगतात. शिवाय हा योग जुळवून आणणारे "जीसिम्स'चे कार्तिक निशाणदार व अर्जुन बरान हेही या शोसाठी उत्सुक आहेत. स्त्री मानसिकतेचा अचूक वेध घेण्यास सज्ज असलेली मुक्ता या कार्यक्रमात काय कसब दाखवते, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. 
 

Web Title: mukta barve radio jockey