ई सकाळ #lLive मध्ये मुक्ताने साधला मनमोकळा संवाद

सौमित्र पोटे/ कॅमेरा : योगेश बनकर.
गुरुवार, 13 जुलै 2017

पुणे: आज दुपारपासूनच अभिनेत्री मुक्ता बर्वेच्या एका ट्विटने धुमाकूळ घातला आहे. पुण्यातील य़शवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये असलेल्या अस्वच्छतेबद्दल तिने फोटोसह कमेंट पास करून नाराजी नोंदवली. ई सकाळच्या व्यासपिठावर लाईव्ह आपल्यानंतर तिने याबाबत तीव्र नाराजी नोंदवली. इतकेच नाही, तर याच कारणामुळे मनात नसताना, आपण औरंगाबादमध्ये प्रयोग करणे थांबवले आहे, असेही तिने सांगितले. 

ह्रदयांतर चित्रपटाच्या प्रमोशन निमित्ताने ती पुण्यात आली होती. या चित्रपटाचा अनुभव तिने सांगितलाच. शिवाय या निमित्ताने, ती करत असलेली नवी मालिका, त्याचा आलेला धक्कादायक टिजर यााबद्दलही सविस्तर चर्चा केली. इतकेच नव्हे, तर या टीजरमुळे कुणी दुखावले असेल तर त्यांची तिने मोकळेपणाने माफीही मागितली. 

ई सकाळच्या फेसबुक पेजवर मुक्ता पहिल्यांदाच लाईव्ह आली होती. ती करत असलेले चित्रपट.. तिने केलेल्या कलाकृती.. आगामी प्रोजेक्ट.. कोडमंत्र नाटक आदीवर यावेळी विस्तृत चर्चा झाली. ई सकाळच्या अमेरिका, युएई आणि भारतातील वाचकांनी या शोमध्ये हिस्सा घेतला. हजारो प्रेक्षकांनी हा संवाद लाईव्ह पाहिला आणि शुभेच्छा दिल्या. 

मुक्ता बर्वे #Live

यावेळी ह्रदयांतर चित्रपटाची माहिती तिने दिली. शिवाय विक्रम फडणीस, सुबोध भावे आदींबद्दल असलेले असोसिएशनही सांगितले. 

Web Title: mukta live on esakal fb page