पार्सलमध्ये अभिनेत्रीला मिळाली अंतर्वस्त्रं आणि सेक्स टॉईज

अंबोली पोलिसांकडे एका प्रख्यात अभिनेत्रीनं तक्रार दाखल केलीय.
पार्सलमध्ये अभिनेत्रीला मिळाली अंतर्वस्त्रं आणि सेक्स टॉईज

मुंबई - अंबोली पोलिसांकडे एका प्रख्यात अभिनेत्रीनं तक्रार दाखल केलीय. त्यामध्ये तिनं आपल्या एका अनोळखी व्यक्तीनं पार्सल पाठवले आहे. त्यात त्या अभिनेत्रीला अंतर्वस्त्र आणि सेक्स टॉईज पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे तिला धक्का बसला आहे. वास्तविक हा प्रकार काही पहिल्यांदा घडलेला नाही. तिला यापूर्वी देखील त्या व्यक्तीनं अशा प्रकारच्या वस्तू पाठवलेल्या आहेत. तिनं सुरुवातीला या प्रकाराकडे दुर्लक्ष केले. मात्र हा प्रकार पुढे एक दोन वेळा घडल्यानं त्या अभिनेत्रीनं हा प्रकार गांभीर्यानं घेतला आहे. तिनं आता पोलिसांकडे धाव घेतली आहे. पोलिसांनी त्या अभिनेत्रीची तक्रार नोंदवून घेत त्या अज्ञात व्यक्तिचा शोध सुरु केला आहे.

त्या अज्ञात व्यक्तीनं आतापर्यत अभिनेत्रीला आठ वेळा अंतर्वस्त्रं आणि सेक्स टॉईज पाठवली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अद्याप ती व्यक्ती सापडली नसून तिचा शोध सुरु आहे. 28 वर्षीय अभिनेत्रीनं अंबोली पोलिसांकडे तक्रार दिली आहे. दोन महिन्यांपासून हा प्रकार सुरु आहे. तिला वेगवेगळ्या ठिकाणांहून पार्सल यायला सुरुवात झाली. तेव्हा तिला धक्का बसला. त्याबद्दल चौकशी केल्यास तिला कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर त्याच त्याच प्रकारांमुळे आपण त्रस्त झाल्यानं पोलिसांकडे त्याबाबत तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतल्याचे तिनं सांगितलं. अंबोली पोलीस ठाण्यातील एका पोलीस अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, आम्ही एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाची प्राथमिक चौकशी सुरु झाली आहे. अजून आमच्याकडे त्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती हाती आलेली नाही.

पोलिसांना काही व्यक्तींचे मोबाईल नंबर मिळाले आहेत. ज्यातून त्या व्यक्तीपर्यत त्यांना पोहचता येणं शक्य आहे. येत्या काही दिवसांत आपण त्या व्यक्तीला शोधून काढू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. सेलिब्रेटींना अशाप्रकारे त्रास देणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. एखाद्या रहस्यमय चित्रपटाला शोभावी अशा प्रकारात वेगवेगळ्या प्रकारे आपल्या आवडत्या सेलिब्रेटीला सरप्राईज देण्यात त्यांना वेगळाच आनंद होत असल्याचे दिसून आले आहे.

पार्सलमध्ये अभिनेत्रीला मिळाली अंतर्वस्त्रं आणि सेक्स टॉईज
शर्लिन, पुनम पांडेला कोर्टाचा दिलासा, राजवर केले होते आरोप
पार्सलमध्ये अभिनेत्रीला मिळाली अंतर्वस्त्रं आणि सेक्स टॉईज
पुनम पांडेनं सांगितलं कुंद्राच्या अश्लील उद्योगामागचं 'राज'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com