अखेर रणवीर सिंग वर गुन्हा दाखल, न्यूड फोटोशूट प्रकरण अंगाशी शेकणार ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Case file against ranveer singh for his nude Photoshoot

अखेर रणवीर सिंग वर गुन्हा दाखल, न्यूड फोटोशूट प्रकरण अंगाशी शेकणार ?

बॉलीवुडचा आघाडीचा अभिनेता रणवीर सिंगला त्याचं न्युड फोटोशूट चांगलंच महागात पडतंय. अॅक्टींगसाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता त्याच्या न्युड फोटोनं भलत्याच चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या भन्नाट चर्चेनंतर आता रणवीर सिंगवर गुन्हा दाखल झालाय.राजकीय, सामाजिक स्तरांतील दिग्गजांनी त्यांच्या न्युड फोटोशुटवर आक्षेप घेत त्याच्याविरोधात पोलीसांत तक्रारी केल्या आहेत. आता यानंतर परत एक मोठी बातमी पुढे येतेय. रणवीरविरोधात न्युड फोटोशुटप्रकरणात चेंबुर पोलीसांत गुन्हा दाखल झालाय. (Case file against ranveer singh for his nude Photoshoot)

देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये देखील रणवीरच्या न्युड फोटोशुटचा निषेध करण्यात आला आहे. मध्यप्रदेशातील इंदोरमधील लोकांनी रणवीरसाठी कपडे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. इंदोरमध्ये सामाजिक काम करणाऱ्या त्या संस्थेनं कपडे गोळा करुन रणवीरप्रती आपला निषेध व्यक्त केला आहे. मुंबईमध्ये देखील रणवीरच्या त्या फोटोंवरुन नाराजी व्यक्त करण्यात आली होती.

आपलं स्पष्ट मत मांडणाऱ्या राम गोपाल वर्मांनी(Ram Gopal Varma) देखील रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटवर प्रतिक्रिया दिली आहे. न्यूड फोटोशूट प्रकरणात रणवीरनं भारतीय संस्कृतीचा अपमान केल्याचा उल्लेख करत एका अशासकीय संस्थेनं मुंबईतील चेंबूर पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. आता या तक्रारीवरून रणवीर सिंगवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

हेही वाचा: Ranveer Singh बोल्ड फोटो; या अभिनेत्याविरोधातही झालेली तक्रार

NGO ने केलेल्या तक्रारी संदर्भात लिहिलं आहे की,''आम्ही गेल्या सहा वर्षांपासून विधवा महिलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करीत आहोत. गेल्या आठवड्यात आम्ही रणवीर सिंगचे काही न्यूड फोटो व्हायरल होताना पाहिले. ते फोटो ज्या पद्धतीनं क्लीक केले आहेत ते पाहून कोणाही महिला किंवा पुरुषाला लाज वाटावी''.

Web Title: Mumbai Chembur Police Filed A Case Against Ranveer Singh For His Nude Photoshoot

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..