esakal | कुंद्राचं गुप्त कपाट उलगडणार सर्व 'राज'?
sakal

बोलून बातमी शोधा

raj kundra

कुंद्राचं गुप्त कपाट उलगडणार सर्व 'राज'?

sakal_logo
By
स्वाती वेमूल

अश्लील चित्रफीतप्रकरणी मुंबई पोलिसांनी अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या Shilpa Shetty जुहू इथल्या घरी आणि राज कुंद्राच्या Raj Kundra विआन, जे.एल. स्ट्रीम कार्यालयांमध्ये छापा घातला. यावेळी मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना राजच्या कार्यालयामध्ये गुप्त कपाट सापडल्याची माहिती समोर येत आहे. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. अश्लील चित्रफितनिर्मिती प्रकरणात पुरावे शोधण्यासाठी राज कुंद्राच्या घर आणि कार्यालयांची झाडाझडती घेण्यात आली होती. यादरम्यान गुप्त कपाट सापडलं असून त्या कपाटात काय होतं, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. (Mumbai Crime Branch finds hidden cupboard in Raj Kundras office slv92)

पोलिसांनी शुक्रवारी शिल्पा शेट्टीचा जबाब नोंदवून घेतला. कारवाईदरम्यान शिल्पा शेट्टीचा पती आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी राज कुंद्रालाही पोलीस तिथं घेऊन गेले होते. राज कुंद्राने आर्म्स प्राइम मीडिया ही कंपनी स्थापन केली होती. त्याद्वारे त्याने 'हॉटशॉट' हे अॅप लाँच केलं होतं. हे अॅप लंडन इथल्या केनरिन या कंपनीला विकले होते. मात्र राज कुंद्राच्या विआन इंडस्ट्रीज या कंपनीच्या माध्यमातून हे अॅप चालवले जात होते. या अॅपद्वारे पॉर्न चित्रफितींची निर्मिती आणि प्रसारण केले जात होते, असा आरोप आहे. शिल्पा शेट्टीसुद्धा विआन इंडस्ट्रीज कंपनीत एक संचालक होती. त्यामुळे या गुन्ह्यात शिल्पा शेट्टीचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी शिल्पाच्या घरातील लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक दस्तावेज ताब्यात घेतले.

हेही वाचा: कठीण काळात बहीण शिल्पा शेट्टीसाठी शमिताची खास पोस्ट

पॉर्नोग्राफीतून मिळालेला पैसा सट्टेबाजीत?

अश्लील चित्रफितींच्या प्रसारणातून आलेला पैसा सट्टेबाजीमध्ये गुंतवल्याचा संशयही पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. जागतिक पातळीवर बेटिंगमध्ये असलेल्या मर्क्युरी इंटरनॅशनल या कंपनीच्या बँक ऑफ आफ्रिका या बँकेच्या खात्यातून राज कुंद्राच्या येस बँकेतील खात्यात काही रक्कम हस्तांतरित करण्यात आली आहे. ही रक्कम सट्टेबाजाराच्या व्यवहारातील असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान शुक्रवारी राज कुंद्राला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला २७ जुलैपर्यंत कोठडी सुनावली आहे.

loading image
go to top