मुंबई हल्ल्यातील अज्ञात गोष्टींवर बनतोय मेडिकल ड्रामा, 'मुंबई डायरीज २६/११' चा फर्स्ट लूक रिलीज

दिपाली राणे-म्हात्रे
Thursday, 26 November 2020

पुढच्या वर्षी रिलीज होणा-या या सिरीजमध्ये मुंबई शहरावर झालेल्या आतंकवादी हल्ल्यात जीवाची बाजी लावणा-या आणि बहादुरीने याचा सामना करणा-या अधिका-यांना श्रद्धांजली अर्पण केली गेली आहे. 

मुंबई- मुंबईवर २६ नोव्हेंबर २०११ साली झालेल्या हल्लातील काही अज्ञात गोष्टींवर एक सिरीज सादर करण्याचा निर्णय प्राईम व्हिडिओने घेतला आहे. या सिरीजचं नाव असेल मुंबई डायरीज २६/११. पुढच्या वर्षी रिलीज होणा-या या सिरीजमध्ये मुंबई शहरावर झालेल्या आतंकवादी हल्ल्यात जीवाची बाजी लावणा-या आणि बहादुरीने याचा सामना करणा-या अधिका-यांना श्रद्धांजली अर्पण केली गेली आहे. 

हे ही वाचा: व्हिडिओ: 'पठाण' सिनेमाच्या शूटिंगमधून ब्रेक घेत बोट राईटवर निघाला शाहरुख खान  

कोंकणा सेन शर्मा, मोहित रैना, चीना देसाई आणि श्रेया डॉक्टरांच्या भूमिकेत दिसत असून या सिरीजमध्ये डॉक्टर, नर्सेस, पॅरा मेडिकल आणि हॉस्पिटल कर्मचा-यांची आत्तापर्यंत अज्ञात असलेली कहाणी प्रेक्षकांसमोर मांडली जाईल. प्राईम व्हिडिओने मुंबईवर झालेल्या या आतंकवादी हल्ल्याच्या १२ वर्षानिमित्त आतंकवाद्यांशी दोन हात करणा-या हिरोंना या सिरीजच्या माध्यमातून सलाम केला आहे. या सिरीजचा फर्स्ट लूक आज या हल्ल्याला १२ वर्ष झाल्याच्या निमित्ताने रिलीज केला गेला. 

मेडिकल ड्रामा असलेल्या 'मुंबई डायरिज २६/११' या सिरीजचं दिग्दर्शन निखिल अडवाणी सोबतंच निखिल गोंजालविस यांनी केलं आहे. सिरीजचा प्रिमिअर मार्च २०२१ मध्ये केला जाईल. ही सिरीज हॉस्पिटलमध्ये तयार केली गेली आहे. ही सिरीज त्या डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल कर्मचारी आणि हॉस्पिटलमधील कर्मचा-यांची अज्ञात कहाणी सांगते ज्यांनी मुंबईवर झालेल्या आतंकवादी हल्ल्यात घायाळ झालेल्या लोकांचा जीव वाचवण्यासाठी न थकता अतोनात प्रयत्न केले होते.  या सिरिजच्या फर्स्ट लूकने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे.   

mumbai diaries 26 11 web series on amazon prime retelling the 2008 terror attack  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai diaries 26 11 web series on amazon prime retelling the 2008 terror attack