व्हिडिओ: 'पठाण' सिनेमाच्या शूटिंगमधून ब्रेक घेत बोट राईटवर निघाला शाहरुख खान

दिपाली राणे-म्हात्रे
Thursday, 26 November 2020

नुकताच शाहरुख मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया इथे दिसून आला जिथे त्याने कॅमेरापासून वाचण्याचा बराच प्रयत्न केला मात्र पऍपराझीच्या कॅमेरात तो कैद झालाच. 

मुंबई- बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खानचे चाहते त्याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत. आयपीएलमध्ये दिसून आलेल्या त्याच्या नव्या लूकनंतर त्याच्या आगामी सिनेमाची चाहते मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. आयपीएल संपल्यानंतर शाहरुखने त्याचा आगामी सिनेमा 'पठाण'चं शूटींग सुरु केल्याचं म्हटलं जातंय. नुकताच शाहरुख मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया इथे दिसून आला जिथे त्याने कॅमेरापासून वाचण्याचा बराच प्रयत्न केला मात्र पऍपराझीच्या कॅमेरात तो कैद झालाच. 

हे ही वाचा: स्टार फुटबॉलपटू मॅरेडोना यांच्या निधनामुळे बॉलिवूडही शोकाकुल  

शाहरुख खान त्याच्या 'पठाण' सिनेमाच्या शूटींगमधून थोडा ब्रेक घेत बोट राईडवर गेला आहे. तो एका स्पेशल स्पीड बोटमध्ये बसून अलिबागला जाण्यासाठी निघाला होता. यावेळच्या शाहरुखच्या बोट राईडचा व्हिडिओ आणि काही फोटो सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

शाहरुखने यावेळी ऑलिव्ह रंगाची हुडी घातली होती आणि चेह-यावर काळ्या रंगाचा मास्क डोळ्यांवर काळ्या रंगाचा गॉगल वापरला होता. प्रसिद्ध पॅपराझी मानव मंगलानी यांनी शाहरुखचा हा व्हिडिओ त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. यासोबतंच त्यांनी शाहरुख खानच्या लूकचा एक कोलाज देखील शेअर केला आहे. 

शाहरुखच्या आगामी 'पठाण' या सिनेमाचं शूटींग १८ नोव्हेंबरलाच सुरु झालं आहे. या सिनेमात शाहरुखसोबत दीपिका पदूकोण, जॉन अब्राहम देखील दिसून येतील. इतकंच नाही तर सलमान खानचा यात कॅमिओ असल्याचं देखील म्हटलं जातंय. सलमान शाहरुखच्या या मेगाबजेट सिनेमासाठी खास वेगळे १२ दिवस राखून ठेवणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत आहेत.   

shah rukh khan captured snapped boarding speed boat at the gateway of india in mumbai video viral  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shah rukh khan captured snapped boarding speed boat at the gateway of india in mumbai video viral