esakal | 'इंडियन आयडॉल'चा डॉक्टर बेपत्ता, कविता कौशिक, रिचा चड्ढाची शोधण्यासाठी धडपड
sakal

बोलून बातमी शोधा

kavita kaushik

'इंडियन आयडॉल'चा डॉक्टर बेपत्ता; कविता, रिचा चड्ढाची शोधण्यासाठी धडपड

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: 'इंडियन आयडॉल'च्या (Indian Idol) सेटवर काम करणारा एक डॉक्टर मागच्या पाच दिवसांपासून बेपत्ता आहे. या डॉक्टरला शोधून काढण्यासाठी अभिनेत्री कविता कौशिक (Kavita Kaushik) आपल्या बाजूने सर्व प्रयत्न करत असून तिने सोशल मीडियावर (social media) मदत मागितली आहे. कविता कौशिक या बेपत्ता डॉक्टरबद्दल नियमित टि्वट करत असून त्याच्या कुटुंबाची काय अवस्था आहे, त्याबाबत आपल्या फॉलोअर्सना माहिती देत आहे. डॉ. अमित शर्मा (dr. amit sharma) असे या बेपत्ता डॉक्टरचे नाव आहे. त्यांना शोधून काढण्यासाठी कविता कौशिक आपली ओळख आणि प्रभाव याचा पूर्णपणे वापर करत आहे.

'इंडियन आयडॉल'च्या सेटवर डॉ. अमित शर्मा कन्सलटंट डॉक्टर म्हणून सेवा बजावत होते. डॉ. अमित शर्मा यांनी मागच्या २० वर्षात अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींवर उपचार केले आहेत. इंडियन आयडॉलच्या सेटवर ते डॉक्टर म्हणून सेवा बजावत होते. मागच्या पाच दिवसांपासून ते बेपत्ता असून त्यांच्या आईची वाईट अवस्था आहे. पोलिसांनाही त्यांच्या बेपत्ता असण्याबद्दल माहिती देण्यात आली आहे, असे कविता कौशिकने तिच्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा: गुजरात मॉडेलचा फुगा फुटला, शिवसेनेनं सोडला टीकेचा बाण

बेपत्ता होण्याच्या तीन दिवस आधीपासून डॉ. अमित शर्मा कोणाशी बोलत नव्हते. त्यांनी अन्न-पाणी सोडलं होतं. "तू नेहमी प्रत्येकाच्या फोन कॉलला उत्तर द्यायचास. रात्री, अपरात्री केव्हाही फोन केलास की, उपचारासाठी तू दरवाजावर हजर असायचास. आज तू आजारी होतास, तर कोणाला माहितही नव्हतं. कुठे हरवला आहेस तु, मी तुला शोधून काढणार" असे कविता कौशिकने तिच्या दुसऱ्या टि्वटमध्ये म्हटले आहे. कविता कौशिकचे हे टि्वट निदर्शनास आल्यानंतर अभिनेत्री रिचा चड्ढाने जास्तीत जास्त लोकांना कळावे, यासाठी तेच टि्वट पुन्हा रिटि्वट केले आहे.

loading image
go to top