"मुंबई ड्रम डे'मध्ये संगीताची मेजवानी 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

मुंबई : "मुंबई ड्रम डे' कार्यक्रमात रसिकांना अविस्मरणीय संगीताचा आस्वाद लुटता येणार आहे. यात जगातील व देशातील काही सर्वोत्तम ड्रमर सहभागी होणार आहेत. त्यात पीट लॉकेट, जीनो बॅंक्‍स, कर्ट पीटर्स, स्वरूपा अनंत, लिडीयन नादस्वरम, गिटारवर रहीदम शॉ, बास गिटारवर सोनू संगमेश्‍वरम या कलाकारांचा समावेश आहे. हा कार्यक्रम येत्या 23 फेब्रुवारीला वांद्रे पश्‍चिम येथील सेंट ऍण्ड्य्रूज ऑडिटोरिअममध्ये सायंकाळी 7.30 वाजता पार पडणार आहे. 

मुख्य संयोजक आणि आघाडीचे संगीतकार जीनो बॅंक्‍स यांनी म्हटले की, "मुंबई ड्रम डे' ही माझी आवडती संकल्पना आहे. देशातील आणि जगभरातील सर्वोत्तम ड्रमवादक आणि संगीत क्षेत्रातील सर्वोत्तम गुणवत्ता या माध्यमातून एकत्र येत आहे. एकाच व्यासपीठावर सादर होणारा हा कार्यक्रम रसिकांसाठी तो अविस्मरणीय ठरेल.' 
प्रायोजक युनियन बॅंक ऑफ इंडिया हे असून या कार्यक्रमाला गियर हाऊस, फुर्टाडोज स्कूल ऑफ म्युझिक, जस्ट अनदर बीईंग, टाईम्स कार्ड आणि आऊटडोअर भागीदार म्हणून मिनिमॅक्‍सचे सहकार्य लाभले आहे. 
या कार्यक्रमाच्या प्रवेशिका www.bookmyshow.com या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. तसेच या प्रवेशिका सेंट ऍण्ड्य्रूज ऑडिटोरिअम येथेही (दूरध्वनी- 26459667) कार्यक्रमाच्या दिवशी उपलब्ध आहेत. 

Web Title: Mumbai Drum Day