"इंदू सरकार'च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जुलै 2017

मुंबई - "इंदू सरकार' या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध करत त्याला स्थगिती द्यावी, अशी मागणी करणारी प्रिया सिंग पॉल यांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. गांधी कुटुंबीयांपैकी एक किंवा कॉंग्रेस नेते संजय गांधी यांची मुलगी असल्याचे प्रिया सिंग सिद्ध करू शकत नसल्याचे कारण देत न्यायालयाने या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देता येत नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील करणार असल्याचे त्यांच्या वकिलांनी सांगितले. 

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी हे जन्मदाते वडील (बायोलॉजिकल फादर) असल्याचा दावा करत, या चित्रपटात संजय गांधी यांचे वैयक्तिक आयुष्य चुकीच्या पद्धतीने दाखवल्याचे म्हणत, या चित्रपटाचे प्रदर्शन रोखावे, अशी मागणी प्रिया सिंग पॉल यांनी वकील तन्वीर निजाम यांच्याद्वारे उच्च न्यायालयात केली होती. 

दिग्दर्शक मधुर भांडारकर यांचे वकील वीरेंद्र सराफ यांनी मात्र या मागणीला जोरदार विरोध केला. चित्रपट शुक्रवारपासून (ता. 28) प्रदर्शित होत आहे. 

जन्मदात्यांचा शोध घेतानाच याचिका दाखल 
दिल्लीतील एका अनाथाश्रमातून प्रिया सिंग यांना दत्तक देण्यात आले होते. त्यामुळे जन्मदात्यांबाबत त्यांचा शोध सुरू आहे. गांधी कुटुंबीयांसोबत त्यांचा पत्रव्यवहार सुरू असून, "डीएनए' सॅम्पल मिळावे यासाठी विनंती केली आहे. गांधी कुटुंबीयांशी त्यांचा काही संबंध आहे का? हे सिद्ध करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांतच या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मुद्दा आल्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली, असे प्रिया सिंग यांच्या वकिलांनी सांगितले.

Web Title: mumbai news indu sarakar movie Madhur Bhandarkar