Urfi Javed: उर्फीला बलात्कार आणि खुनाच्या धमक्या देणाऱ्या तरुणाला बिहारमधून अटक.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai police arrested navin giri from bihar who gave death and rape threats to urfi javed

Urfi Javed: उर्फीला बलात्कार आणि खुनाच्या धमक्या देणाऱ्या तरुणाला बिहारमधून अटक..

urfi javed: आपल्या विचित्र फॅशनमुळे चर्चेत सतत असलेली उर्फी जावेद गेले काही दिवस वेगळ्याच गोष्टींमुळे चर्चेत आहे. तिला व्हॉटसप कॉल करून बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी एक इसम देत होता. या प्रकरणाची बरीच चर्चा झाली, अखेर मुंबई पोलिसांनी कारवाई करत त्या धमकी देणाऱ्या तरुणाला अटक केली आहे.

(mumbai police arrested navin giri from bihar who gave death and rape threats to urfi javed)

हेही वाचा: Bigg Boss Marathi 4: अभिजीत बिचुकले दात घासत नाही आणि वॉशरूममध्ये तर.. राखी सावंतने सांगितलेला किस्सा ऐकाच..

सातत्याने धमकी येत असल्याने या संदर्भात उर्फी जावेदने गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी शोध घेतला आणि बिहारमधील पाटणा येथून नवीन गिरी नावाच्या तरुणाला अटक केली. या प्रकरणी पोलीसांनी सांगितले की, 'पाटणा शहरातील नवीन गिरी नावाचा तरुण उर्फीला धमकावत असल्याचे तांत्रिक तपासातून आढळून आले. त्यानंतर मुंबई पोलिसांनी पाटणा येथे जाऊन त्याला बेड्या ठोकल्या. पाटणा पोलिसांच्या मदतीने एका हॉटेलमधून त्याला अटक करून मुंबईत आणण्यात आले आहे. सध्या त्याची चौकशी सुरू आहे.'

हेही वाचा: Neha Malik: टॉवेल फोटोशूट करणाऱ्या नेहाचा त्यापेक्षा जबर हॉट लुक..

उर्फी नवीनला आधीपासूनच ओळखते. तिने इंस्टाग्रामवर सांगितले होते की, 'नवीन हा तीन वर्षांपूर्वी तिच्या घरचा एजंट होता आणि त्याच्याकडे उर्फीचा फोन नंबरही आहे. तोच तिला अशा पद्धतीचे कॉल आणि धमक्या देत आहे. अश्लील शिव्या देत आहे. विशेष म्हणजे वेगवेगळ्या नंबरवरुन तो तिला त्रास देत असल्याचेही उर्फीने सांगितले होते. उर्फीने तिच्या तक्रारीसोबत कॉल रेकॉर्डिंगही पोलिसांना दिले होते. पोलिसांनी नवीनला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध आयटी अॅक्ट आणि धमकावण्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी केलेल्या तपासात नवीन हा रिअल इस्टेट ब्रोकर असल्याचे उघड झाले असून, त्याने उर्फीला भाड्याने फ्लॅट मिळवून दिला होता. परंतु आरोपीनेही दावा केला आहे. उर्फीने त्याचे कमिशन दिले नाही, म्हणून त्याने ही कृत्य केल्याचे पोलिसांना सांगितले. एवढेच नाही तर त्याने खोटे अकाऊंट बनवून त्याने उर्फीच्या सोशल मीडिया अकाऊंटवर अश्लील कमेंट्स देखील केल्याची कबुली दिली आहे.