esakal | सागरिका सुमन, आर्म्स प्रायव्हेटच्या डायरेक्टरला समन्स, राज अडचणीत?
sakal

बोलून बातमी शोधा

raj kundra and sagarika suman

सागरिका सुमन, आर्म्स प्रायव्हेटच्या डायरेक्टरला समन्स, राज अडचणीत?

sakal_logo
By
युगंधर ताजणे

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री (bollywood actress) शिल्पा शेट्टीचा पती (shilpa shetty) आणि बिझनेसमन राज कुंद्राचं (raj kundra) प्रकरण दिवसेंदिवस आणखी गंभीर होताना दिसत आहे. त्याच्यावर पॉर्न व्हिडिओ (porn video) बनवणे आणि ते एका अॅपवर अपलोड करण्याचा आरोप आहे. त्यामुळे त्याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणावर मुंबई पोलिसांनी त्याच्याविरोधात वेगवेगळे पुरावे सादर केले आहेत. पोलिसांनी असा दावा केला आहे की, त्यांच्याकडे राजच्या विरोधात अनेक पुरावे आहेत. आणि ते न्यायालयाला सादर केले जाणार आहेत. दुसरीकडे अभिनेत्री गहना वसिष्ठनं राजला झालेली अटक ही बेकायदेशीर असल्याचे सांगितले आहे.

राजच्या तपासानं सध्या वेगळं वळण घेतलं आहे. त्या तपासासून अनेकांची नावं समोर येताना दिसत आहे. आता पोलिसांनी मॉडेल आणि अभिनेत्री सागरिका शोना सुमन आणि आर्म्स प्राईम मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर सौरभ कुशवाहा यांना समन्स पाठवले आहे. त्यामुळे या चौकशीतून नेमक्या कोणत्या गोष्टी पोलिसांच्या हाती लागणार हे पाहणे उत्सुकतेचं ठरणार आहे.

आज सौरभची चौकशी होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. पोलिसांना असा संशय आहे की, पॉर्न व्हिडिओ तयार करणं आणि ते विकण्याचे काम करणे यात सौरभचा सहभाग आहे. त्यामुळे त्यांना या प्रकरणात अधिक पुरावे गोळा करण्याचं मोठं आव्हान आहे. गेल्या काही दिवसांपासून राज कुंद्राच्या प्रकरणात वेगवेगळ्या घडामोडी घडताना दिसत आहे. काही करुन पोलिसांना राजच्या पॉर्नोग्राफी प्रकरणाचा छडा लावायचा आहे. त्यासाठी त्यांनी सखोल तपास सुरु केला आहे.

मुंबई पोलिसांनी सागरिकालाही चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. सागरिकाचं नाव अशा लोकांपैकी आहे ज्यांनी राजची कंपनी लंडनमध्ये आहे असे सांगितले होते. केनरिन नावाच्या कंपनीचा तो मालक आहे. अशी माहितीही यानिमित्तानं समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी सागरिकानं खुलासा केला होता की, राजनं मला न्युड ऑडिशनसाठी ऑफर केली होती. त्यामुळे सागरिका चर्चेत आली होती.

loading image
go to top