'तुम्हा सगळ्या लांडग्यांना सोडणार नाही, लक्षात ठेवा'

सकाळ ऑनलाईन टीम
Thursday, 21 January 2021

मुंबई पोलिसांनी शुक्रवारी कंगणाला जुहू पोलीस ठाण्यात बोलावले आहे. गीतकार जावेद अख्तर यांनी मागच्या वर्षीच्या नोव्हेंबर मध्ये कंगणाच्या विरोधात मानहानीची तक्रार दाखल केली होती.

मुंबई - कोणी  काही म्हणाले तरी कंगणा कुणाचे ऐकणार नाही हे आतापर्यतच्या तिच्या कृतीवरुन दिसून आले आहे. सतत वादग्रस्त वक्तव्ये करुन सर्वांचे लक्ष वेधून घेणा-या कंगणाला न्यायालयानंही फटकारले आहे. तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर बंदी घालण्यात आली आहे. याचे कारण म्हणजे ताळतंत्र सोडून बडबड करणे. गेल्या काही दिवसांपासून तिचे बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटीशी वाजले आहे. त्यात गीतकार जावेद अख्तर यांच्याबरोबरचा वाद चांगलाच पेटला आहे.

जावेद अख्तर यांनी कंगणाच्या विरोधात न्यायालयात मानहानीची तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर कंगणाला पोलिसांनी समन्स बजावले आहे. तसेच तिला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्यास सांगितले आहे. यासगळ्या प्रकरणावर टीका करताना सोशल मीडियावर अख्तर यांच्यावर टीका केली आहे. ती म्हणाली, आज माझ्यावर वेळ आहे. मला आणखी एक समन्स देण्यात आले आहे. अशावेळी सगळे लांडगे एकत्र आले आहे. त्यामागचा त्यांचा उद्देश हा मला जेलमध्ये टाकण्याचा आहे. हे मला माहिती आहे. पण मी कुणाला सोडणार नाही. अशावेळी मला त्रास देऊन माझ्यावर 500 पेक्षा जास्त केसेस दाखल करुन नेमकं काय साध्य करायचं आहे. मी जरी मेले तरी माझ्या राखेतून आवाज आल्याशिवाय राहणार नाही तो म्हणजे ' मी तुमच्या सारख्या लांडग्यांना सोडणार नाही.'

मुंबई पोलिसांनी शुक्रवारी कंगणाला जुहू पोलीस ठाण्यात बोलावले आहे. गीतकार जावेद अख्तर यांनी मागच्या वर्षीच्या नोव्हेंबर मध्ये कंगणाच्या विरोधात मानहानीची तक्रार दाखल केली होती. त्यावर जावेद अख्तर यांनी असे म्हटले होते की, कंगणाला आपल्यावर अपमानास्पद टिप्पणी केली होती. अख्तर यांनी आपल्या याचिकेत असे म्हटले होते की, सुशांतसिंगच्या मृत्युनंतर कंगणाने माझ्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. कंगणानं जे काही आरोप केले आहेत ते चूकीचे आहेत. त्यामुळे माझी मानहानी झाली आहे. कंगणानं ऋतिक रोशन प्रकरणात प्रतिक्रिया देणा-या अख्तर यांना शांत राहण्यास सांगितले होते.

अजय देवगणची 'थँक गॉड' ची तयारी, मधुर, तुषार कपूरच्या चित्रपटांची घोषणा

कंगणानं बॉलीवूडमधल्या काही कलाकारांना मुव्ही माफिया असे म्हटले होते. याशिवाय अनुराग कश्यप, स्वरा भास्कर, तापसी पन्नु, जावेद अख्तर, दिलजीत दोसांज सारख्यांवरही कंगणानं तोफ डागली होती. त्यामुळे ती वादाच्या भोव-यात सापडली.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai police summons Kananga ranaut in defamation case appear before juhu police on january 22