मुंबई-पुणे-मुंबईचा तिसरा भाग येणार; या वर्षाच्या अखेरीस होणार चित्रिकरणास सुरूवात

सौमित्र पोटे
गुरुवार, 15 जून 2017

साधारणपणे एक सिनेमा गाजला कि त्याचा सिक्वेल करायची तयारी सुरू होते. मग तिसरा भाग येतो. इंग्रजी आणि हिंदीमध्ये ही बाब आता नवी राहीली नाही. पण मराठीत मात्र सहसा सिक्वेल बनत नाहीत. मुंबई पुणे मुंबई त्याला अपवाद होता. सतीश राजवाडे दिग्दर्शित या सिनेमाला अमाप लोकप्रियता मिळाली. स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांची जोडी रसिकांना आवडली. लोकांचा ओढा लक्षात घेऊन या टिमने दुसरा भागही आणला. पण इथवर ही टिम थांबणारी नाही. कारण आता मुंबई पुणे मुंबई या सिनेमाचा तिसरा भाग आता येणार आहे. सध्या या सिनेमाच्या लेखनाचे काम चालू असून या वर्षाअखेरीस या सिनेमाचे चित्रिकरण सुरू होईल. 

पुणे : साधारणपणे एक सिनेमा गाजला कि त्याचा सिक्वेल करायची तयारी सुरू होते. मग तिसरा भाग येतो. इंग्रजी आणि हिंदीमध्ये ही बाब आता नवी राहीली नाही. पण मराठीत मात्र सहसा सिक्वेल बनत नाहीत. 'मुंबई पुणे मुंबई' त्याला अपवाद होता. सतीश राजवाडे दिग्दर्शित या सिनेमाला अमाप लोकप्रियता मिळाली. स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांची जोडी रसिकांना आवडली. लोकांचा ओढा लक्षात घेऊन या टिमने दुसरा भागही आणला. पण इथवर ही टिम थांबणारी नाही. कारण आता 'मुंबई पुणे मुंबई' या सिनेमाचा तिसरा भाग आता येणार आहे. सध्या या सिनेमाच्या लेखनाचे काम चालू असून या वर्षाअखेरीस या सिनेमाचे चित्रिकरण सुरू होईल. 

दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनीही याला दुजोरा दिला. या सिनेमाबद्दल ई सकाळशी बोलताना सतीश म्हणाला, 'पहिल्या दोन भागांवर रसिकांनी तुफान प्रेम केले. दुसरा भाग आल्यानंतर त्या फॅमिलीबाबत आणखी पाहण्याची ईच्छा अनेकांनी व्यक्त केली. म्हणून आम्ही तिसर्या भागाची जुळवाजुळव केली. मराठीत असा प्रयोग पहिल्यांदाच होतोय. याचेही आम्हाला कोतुक वाटते. सध्या या सिनेमाच्या लेखनाचे काम सुरु असून आत्ता यावर बाकी काही बोलणे योग्य ठरणार नाही.' 

या सिनेमातही 'मुंबई पुणे मुंबई'च्या दुसर्या भागात दिसलेली सगळी कलाकारांची फौज दिसणार आहे. या दोन घरांमध्ये नेमके काय होते ते या सिनेमात दिसण्याची शक्यता आहे. स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे ही जोडी या सिनेमाचा मुख्य यूएसपी आहे. या सिनेमाचा दुसरा भाग अश्विनी शेंडे यांनी लिहिला होता. आता तिसर्या भागासाठी नव्या लेखकाची नेमणूक करण्यात आली आहे. 

Web Title: Mumbai pune mumbai part 3 soon esakal news