Mumbai Police: 'खबरदार, सीट बेल्टवरुन जोक कराल तर'! कॉमेडियनला फटकारलं

मुंबई पोलिसांनी सीट बेल्टवरुन सोशल मीडियावर वेगळ्याच प्रकारे मेसेज पसविणाऱ्या कॉमेडियनला चांगलेच फटकारले आहे.
Mumbai Police news
Mumbai Police newsesakal

Mumbai traffic police: मुंबई पोलिसांनी सीट बेल्टवरुन सोशल मीडियावर वेगळ्याच प्रकारे मेसेज पसविणाऱ्या कॉमेडियनला चांगलेच फटकारले आहे. त्याची चर्चा सुरु झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील वाहतूक कोंडी याशिवाय प्रवाशांची सुरक्षा यासाठी नव्या नियमांची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यावर मुंबई पोलिसांनी कार्यवाही सुरु केली आहे.

यापुढील काळात केवळ चालकच नाहीतर त्याच्यासमवेत असलेल्या इतरांनी देखील सीट बेल्ट लावणे बंधनकारक असल्याची नियमावली जाहीर करण्यात आली आहे. त्याची अंमलबजावणी देखील सुरु करण्यात आली आहे. त्यावरुन आता मुंबई पोलिसांनी एकाला या नियमाची थट्टा करणाऱ्याला चांगलेच फटकारले आहे. आम्ही हे सगळे तुमच्या सुरक्षेसाठी करतो आहोत. तेव्हा तुमच्याकडून चांगले सहकार्य अपेक्षित आहे. आपणच असे बेशिस्तपणे वागू लागलो तर काय होईल...असा प्रश्न पोलीस प्रशासनानं विचारला आहे.

तुमची सुरक्षा हा काही विनोद नाही. तेव्हा आपण वाहनसुरक्षेच्या नियमांवरुन काय बोलतो आहोत याचा गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे. असेही मुंबई पोलिसांनी म्हटले आहे. दुसरीकडे नाशिकमधील वाहतूक कोंडी सोडणवण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांची मदत घेण्यात आली होती. यासगळ्यात नियमांचे पालन न करणाऱ्यांविषयी कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Mumbai Police news
कबुतराचं मुंडकं धरलं अन् तोंडचा घास पळवला; चिमुकलीचा Video Viral

एका नेटकऱ्यानं मुंबईकरानो आता सीट बेल्ट बांधल्याचे प्रिंटींग असणारे टी शर्ट परिधान करण्याची वेळ आली आहे. अशा आशयाचे एक ट्विट केले होते. ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरलही झाले होते. त्यावरुन मुंबई पोलिसांनी त्याला चांगलेच खडसावले आहे.

Mumbai Police news
Video: थेट झुलत्या केबल पुलावर घातली कार; महाराष्ट्रातील पर्यटकाचा कारनामा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com