Asha Bhosle Mumtaz Dance Video
Asha Bhosle Mumtaz Dance VideoEsakal

Mumtaz-Asha Bhosle: आनंदाला वयाचं बंधन नाही! आशा भोसले अन् मुमताज यांचा भन्नाट डान्स व्हिडिओ व्हायरल

Dance Video: मुमताज आणि आशा भोसले यांचा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे.

Asha Bhosle Mumtaz Dance Video: जुनी गाणी म्हटलं आजही प्रेक्षकांच्या लक्षात राहणारी आणि तितकीच लोकप्रिय. आजही जुनी गाणी रसिकांच्या ओठावर असतात.

त्यातच 70 च्या दशकातील गाण्यामध्ये एक वेगळेपणा होता. एक गोडवा होता. त्यामुळे आजही त्या काळातील गाणी लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत.

असचं त्या काळातील एक प्रसिद्ध गाणं म्हणजे 'कोई शहरी बाबू दिल लहरी बाबू'. आजही हे गाणं अनेकांना तोंड पाठ असेल.

Asha Bhosle Mumtaz Dance Video
2023 Academy Museum Gala: दीपिकाच्या शिरपेचात पुन्हा मानाचा तुरा! ऑस्करनंतर आता 'या' जागतिक इव्हेंटमध्ये दाखवली अदा

कोई शहरी बाबू दिल लहरी हे 70 च्या दशकातील सर्वात प्रसिद्ध गाणं होतं. आता या गाण्यावर मुमताज आणि आशा भोसले यांनी भन्नाट डान्स केला आहे. मुमताज आणि आशा भोसले यांचा आनंदाने नाचतानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोन्ही कलाकार नाचताना दिसत आहे.

या व्हिडिओनंतर दोघेही इंडस्ट्रीतील दिग्गज कलाकार आहे असं कुणालाच वाटणार नाही. सध्या प्रेक्षकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे.

मुमताज आणि आशा भोसले यांच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर दोघी आजही पूर्वीसारख्याच सुंदर दिसत आहेत. हा डान्स व्हिडीओ हाऊस पार्टीमधला दिसतोय.

Asha Bhosle Mumtaz Dance Video
Tiger 3 OTT Release: भाईजानचा 'टायगर 3' ओटीटीवर धडकणार! कधी आणि कुठे होणार प्रदर्शित ?

आशा भोसले आणि मुमताज यांची वेगळी ओळख सांगायची आवश्यकता नाही. या दोघांनीही एक काळ गाजवला आहे. त्यांनी लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. मुमताज यांनी 1960 आणि 1970 च्या दशकात अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.

ज्यात रोटी, दो रास्ते, आप की कसम, हरे रामा हरे कृष्ण, ब्रह्मचारी यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांचा सामावेश आहे. मुमताज यांनी त्यांच्या करिअरमध्ये 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

तर आशा भोसले यांनी 1943 मध्ये आपल्या करिअरला सुरुवात केली. 2006 मध्ये त्यांनी स्वतः सांगितले की, त्यांनी 12 हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. आशा भोसले यांच्या नावाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे.

सध्या दोघांचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत असून नेटकरी त्यांच्या या व्हिडिओवर कमेंट करत आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आनंदाला वयाचं बंधन नसतं हे मात्र नक्कीच कळतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com