Munawar Faruqui Viral Video : प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मुलीसोबत मुनव्वर दिसला अन् फसला! चक्क तो...

बिग बॉसचा विजेता मुनव्वरचा(Munawar Faruqui Viral Video) तो व्हिडिओ समोर आला आणि वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली!
Munawar Faruqui Viral video
Munawar Faruqui Viral video esakal

Munawar Faruqui Viral video : बिग बॉसच्या १७ (Bigg Boss 17) व्या पर्वाचा विजेता मुनव्वर फारुखी (Munawar Faruqui) हा सध्या वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. तो जिंकल्यानंतर त्याचे जे व्हिडिओ व्हायरल झाले होते त्यामुळे तो अडचणीतही आला होता. आता त्याचा एक व्हिडिओ समोर आला असून त्यात तो प्रसिद्ध अभिनेत्रीच्या लेकीसोबत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

मुनव्वर हा सध्या बॅक टू बॅक पार्टी मध्ये दिसून आला आहे.त्याचे फोटो आणि व्हिडिओ यावरुन त्याची तरुणाईमध्ये असणारी क्रेझही दिसून आली आहे. ओरी सोबत मुनव्वर एका पार्टीमध्ये सहभागी झाला होता. ओरीचं ते फोटोसेशन हे चाहत्यांच्या प्रतिक्रियेचा खास विषय आहे. मात्र या सगळ्यात कॉमेडियन मुनव्वर दिसला आणि चर्चेला सुरुवात झाली. यावेळी तो बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मुलीसोबत दिसल्यानं चाहत्यांनी त्या व्हिडिओवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

बिग बॉसचा विजेता झाल्यानंतर मुनव्वरचे सेलिब्रेशन अजुनही सुरुच आहे. सध्या तो, ओरी आणि प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेनची मुलगी रेने ही एका पार्टीमध्ये सहभागी झाले होते.यावेळी त्यांनी केलेलं फोटोसेशन हे चर्चेत आलं आहे. त्यावरुन आलेल्या कमेंटसमध्ये त्यांनी मुनव्वरला डेटिंगवरुन प्रश्न विचारले आहेत.

Munawar Faruqui Viral video
Ranbir Kapoor : 'कामाचे तास फिक्स पाहिजे, सेटवर शिस्त हवी अन्...' भन्साळींच्या 'लव्ह अँड वॉर' साठी रणबीरच्या काय आहेत अटी?

त्या पार्टीमध्ये आयशाही गेली होती...(Ayesha Khan)

मुनव्वर फारुखी, ओरी आणि रेने ज्या पार्टीमध्ये गेले होते त्याच पार्टीत आयशा खानही (Ayesha Khan) सहभागी झाली होती. पापाराझ्झींनी त्यांना कॅमेऱ्यात कैद केले. त्यानंतर जशी मुनव्वरची इंट्री झाली तसे पापाराझ्झींनी त्याचे फोटो काढण्यासाठी गर्दी केल्याचे दिसून आले. बिग बॉस १७ च्या वेळेस आयशानं मुनव्वरवर विश्वासघात केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांच्यात काही दिवसानंतर मैत्रीही झाली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com