Munawwar Rana Rites : 'उर्दू शायरीतला तारा निखळला'! जावेद अख्तर यांनी मुनव्वर राणांना दिला खांदा

उर्दू शायरीतील मोठं नाव असणाऱ्या मुनव्वर राणा यांच्या निधनानं त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
Javed akhtar in Lucknow at Munawwar Rana last rites
Javed akhtar in Lucknow at Munawwar Rana last ritesesakal

Javed akhtar in Lucknow at Munawwar Rana last rites : उर्दू शायरीतील मोठं नाव असणाऱ्या मुनव्वर राणा यांच्या निधनानं त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. आपल्या शायरीतून विविध विषयांवर भाष्य करत चाहत्यांना जिंकून घेणाऱ्या मान्यवरांमध्ये राणा यांचा उल्लेख करावा लागेल. त्यांच्या निधनानं प्रसिद्ध गीतकार आणि पटकथाकार जावेद अख्तर यांची प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.

मुनव्वर राणा यांच्या अंत्यविधीसाठी जावेद अख्तर हे लखनऊला गेले होते. यावेळी त्यांना मुनव्वर राणा यांच्या पार्थिवाला खांदा दिल्याचे दिसून आले. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून अख्तर यांनी राणा यांच्या निधनानंतर दिलेली श्रद्धांजलीपर दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. भारताच्या शायरी परंपरेचं मोठं नुकसान राणा यांच्या निधनानं झालं आहे. त्यांच्या रुपानं उर्दु शायरीतील लखलखता तारा निखळून पडला आहे.

राणा यांच्या जाण्यानं मला मोठा धक्का बसला आहे. त्यांचं जाणं हे मनाला चटका लावून जाणारं आहे. असा व्यक्ती पुन्हा होणार नाही. त्यांच्या जाण्यानं उर्दू शायरीमध्ये जी पोकळी निर्माण झाली आहे ती कधीही भरुन येणार नाही. अख्तर हे गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी रणबीर कपूरच्या अॅनिमलवर दिलेली प्रतिक्रिया यामुळे त्यांच्यावर नेटकऱ्यांनी आगपाखड केली होती.

जावेद अख्तर हे राणा यांच्या अंत्यविधीसाठी लखनऊ येथे गेले असताना ते कमालीचे भावूक झाल्याचे दिसून आले. राणा यांच्या जाण्यानं संबंध हिंदूस्थानच्या एका वेगळ्या संस्कृतीचे झालेले नुकसान भरुन न येणारे आहे. आई या विषयावर विविध गझलची निर्मिती करणारे प्रसिद्ध कवी, शायर मुनव्वर राणा यांचे रविवारी लखनऊ मध्ये निधन झाले. वयाच्या ७१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Javed akhtar in Lucknow at Munawwar Rana last rites
Munawwar Rana Passed Away : प्रसिद्ध उर्दू कवी मुनव्वर राणा यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी निधन

देशातील प्रसिद्ध शायरांपैकी एक म्हणून मुनव्वर राणा यांचे नाव घेतले जायचे.त्यांनी देशभरातील अनेक मुशायरांमध्ये आपल्या सादरीकरणानं चाहत्यांना जिंकून घेतले. गेल्या काही दिवसांपासून ते प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्रस्त होते. लखनऊमधील पीजीआय रुग्णालयात उपचार सुरु होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com