सस्पेन्स अन् थ्रिलरचा तडका; 'मर्डर मुबारक'चा जबरदस्त टीझर रिलीज; 'या' दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित!

नुकताच 'मर्डर मुबारक' (Murder Mubarak) या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहे.
Murder Mubarak
Murder Mubarak

Murder Mubarak: ओटीटीवरील चित्रपट आणि वेब सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळते. नेटफ्लिक्स या ओटीटीवर प्लॅटफॉर्मवर विविध विषयांवर आधारित चित्रपट आणि वेब सीरिज रिलीज होतात. आता नुकताच 'मर्डर मुबारक' (Murder Mubarak) या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहे. 'मर्डर मुबारक' हा चित्रपट कधी आणि कोणत्या ओटीटी मर्डर मुबारक प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे? जाणून घेऊयात...

'मर्डर मुबारक'चा जबरदस्त टीझर रिलीज

मर्डर मुबारक या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. मर्डर मुबारक या चित्रपटाचा टीझर नेटफ्लिक्सच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. "जो कत्ल करते हैं वो दिखते कैसे हैं, साउथ दिल्ली की शहजादी की तरह या चांदनी चौक के तबाह आशिक की तरह।" हा पंकज त्रिपाठी यांचा डायलॉग टीझरच्या सुरुवातीला ऐकू येतो. त्यानंतर टीझरमध्ये विविध कलाकारांची झलक दिसते. मर्डर मुबारक या चित्रपटाचा टीझर पाहिल्यानंतर असा अंदाज लावला जाऊ शकतो की, हा चित्रपट मर्डर मिस्ट्रीवर आधारित असणार आहे.

"कई हत्यारे हत्यारों की तरह दिखते ही नहीं हैं। वे एक आम औरत या आदमी की शक्ल में होते हैं। मन ही मन मुस्कुरा रहे होते हैं और खुद को बधाइयां दे रहे होते हैं।" या पंकज त्रिपाठी यांच्या टीझरमधील डायलॉगनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

'मर्डर मुबारक' ची स्टार कास्ट

मर्डर मुबारक या चित्रपटात करिश्मा कपूर ,सारा अली खान,संजय कपूर, विजय वर्मा, टिस्का चोपडा, डिंपल कपाडिया आणि सुहेल नैय्यर हे कलाकार मर्डर मुबारक या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार आहे. तगडी स्टार कास्ट असणाऱ्या या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

पाहा टीझर:

कधी रिलीज होणार मर्डर मुबारक?

मर्डर मुबारक हा चित्रपट 15 मार्चला नेटफ्लिक्सला रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर करुन नेटफ्लिक्सनं कॅप्शनमध्ये लिहिलं, "अनेक रंगीबेरंगी भूमिका,हे सर्व तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आले आहेत - मर्डर मुबारक! 15 मार्च रोजी येत आहे, फक्त Netflix वर!"

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com