"अ डेथ इन गंज'चा ट्रेलर प्रदर्शित 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 मे 2017

मि. ऍण्ड मिसेस अय्यर, "पेज 3', "वेक अप सिद' आदी चित्रपटांतील अभिनयामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेणारी कोंकणा सेन शर्मा "अ डेथ इन गंज' चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण करीत आहे.

मि. ऍण्ड मिसेस अय्यर, "पेज 3', "वेक अप सिद' आदी चित्रपटांतील अभिनयामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेणारी कोंकणा सेन शर्मा "अ डेथ इन गंज' चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण करीत आहे. हा थरारपट आहे. त्याचा ट्रेलर रविवारी प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाची कथा 1979 मधील आहे. मॅकलोडगंज येथे सहलीसाठी गेलेल्या कुटुंबाला जे विचित्र अनुभव येतात ते म्हणजे या चित्रपटाची कथा. या चित्रपटात विक्रांत मसी, कल्की कोचलिन, विक्रम देवैया, रणवीर शोरे, तिलोत्तमा शोमे, जीम सर्भ आणि ओम पुरी यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट 2 जूनला प्रदर्शित होणार आहे. 

Web Title: Murder Mystery! Trailer Of Konkona Sen Sharma’s A Death In The Gunj

व्हिडीओ गॅलरी