Murli Raju Death: राम गोपाल वर्मांवर काळाचा आघात काकांचे निधन, आमिर,अल्लु अर्जुनची श्रद्धांजली

बॉलीवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता राम गोपाल वर्मा यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचे काका आणि प्रख्यात निर्माता मधु मंटेना यांचे वडील मुरली राजू यांचे निधन झाले आहे.
Murli Raju Passed awa
Murli Raju Passed awaesakal

Murli Raju Passed away Aamir Khan Allu Arjun pay Tributes : बॉलीवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता राम गोपाल वर्मा यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचे काका आणि प्रख्यात निर्माता मधु मंटेना यांचे वडील मुरली राजू यांचे निधन झाले आहे. त्यांनी हैद्राबादमधील एका रुग्णालयात दाखल कऱण्यात आले होते. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच भारतीय मनोरंजन विश्वावर मोठी शोककळा पसरली आहे.

मुरली राजू यांना काही दिवसांपूर्वी हदयविकारानं त्रस्त होते. त्यानंतर त्यांना उपचारासाठी हैद्राबादमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यांना बॉलीवूडमधील वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी श्रद्धांजली वाहिली आहे. बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि टॉलीवूडचा सुपरस्टार अल्लु अर्जुन हे राजू यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते.

Also Read - परदेशातही वापरता येणार युपीआय सुविधा...वाचा सविस्तर

मुरली राजू हे ७० वर्षांचे होते. त्यांच्या निधनानंतर मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रेटींनी शोक व्यक्त केला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत बरी नव्हती. सततच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुरली राजू हे प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांचे काका होत. वाढत्या वयासोबत राजू हे विविध आजारांनी त्रस्त होते.

Murli Raju Passed awa
Naseeruddin Shah : 'मुघलांनी काहीही वाईट केलं नाही, अकबरानं तर कधीही...' नसिरुद्दीन शहांना झालं तरी काय!

याशिवाय बॉलीवूडमधील प्रसिद्ध निर्माते मधु मंटेना यांचे वडील असणाऱ्या मुरली राजू यांच्या निधनाचे वृत्त कळताच देशातल्या अनेक सेलिब्रेटींनी हैद्राबादला धाव घेतली आहे. मधु मंटेना एक भारतीय चित्रपट निर्माता असून त्यांनी हिंदी, तेलुगु, बंगाली चित्रपटांमध्ये निर्मिती आणि डिस्ट्रिब्युशनमध्ये काम केले आहे.

Murli Raju Passed awa
Mallika Sherawat : 'मल्लिका रंगली, समाधी भंगली!'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com