
Avadhoot Gupte New Song on Bhim Jayanti News: १४ एप्रिलला देशभरात आंबेडकर जयंती साजरी होणार आहे. यानिमित्ताने मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय संगीतकार, गायक अवधूत गुप्ते यांनी आंबेडकर जयंती निमित्त खास गिफ्ट सर्वांना दिलाय.
नुकत्याच येऊ घातलेल्या आंबेडकर जयंती निमित्त अवधूत गुप्तेने आयुष्यात अशी गोष्ट केली जी त्याने आजवर केली नव्हती.
(music director avadhoot gupte written and music new song on ambedkar jayanti 2023)
आंबेडकर जयंती निमित्त गाऊ बुद्धम शरणं हे नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. सूर नवा ध्यास नवा या लोकप्रिय रिऍलिटी शो मधून घराघरात पोहोचलेला गायक संतोष जोंधळे हे गाणं गायलं आहे.
या गाण्याची खासियत म्हणजे अवधूत गुप्तेने हे गाणं लिहीलंय आणि संगीतबद्ध केलंय. अवधूत गुप्तेला भीमजयंती निमित्त हे गाणं लिहिण्याची आणि संगीतबद्ध करण्याची संधी मिळाल्याने तो प्रचंड खुश आहे.
अवधूत गुप्तेने सोशल मीडियावर त्याच्या भावना शेअर केल्या आहेत.. अवधूत लिहितो.. माझी अनेक वर्षांपासूनची इच्छा होती की,
विश्वरत्न भारतरत्न माननीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्यावर आणि मनुष्य प्राण्याचे जीवन उद्देश समूळ बदलून टाकण्याची ताकद असलेल्या गौतम बुद्धांच्या तत्त्वज्ञानावर आधारित एखादे भीमगीत करावे.
अवधूत पुढे लिहितो.. “सूर नवा ध्यास नवा” च्या मंचावर संतोष जोंधळे चा आवाज ऐकला, त्याचे डॉ. बाबासाहेबांच्या विचारांवरचे प्रेम बघितले आणि मग राहावलच नाही.. म्हणून सादर करीत आहोत संतोषच्या आवाजात मी लिहिलेले आणि संगीतबद्ध केलेले माझे पहिले वहिले भीमगीत.
अशा प्रकारे अवधूतने हे गाणं गायलं आहे. हे गाणं यु ट्यूब वर रिलीज झालं असून अल्पावधीतच हे गाणं व्हायरल झालंय.
अवधूत गुप्ते सध्या अनेक राजकीय पक्षांसाठी सुद्धा गाणी स्वरबद्ध करत आहेत. अवधूतने मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यानिमित्त नवीन गाणं लाँच केलं.
धाडसी करारी राजसाहेब आपले पाठीशी असताना डरायचं न्हाय, वेड कार्यकर्त्यांचे मनात जपले जागे व्हा रे मागे फिरायचं नाय, प्रश्न जिथे जनतेचा मार्ग तिथे मनसेचा, नवनिर्माण घडवूया असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्यावर काहीच दिवसांपूर्वी प्राजक्ता माळीने डान्स केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.