KRK on Gyanvapi Mosque: "आता धर्मांतर करावं"; ज्ञानवापीच्या मुद्द्यावरुन KRKचा मुस्लिमांना सल्ला

सोशल मीडियावर चित्रपट आणि कलाकारांबद्दल अजब-गजब स्टेटमेंट करणाऱ्या केआरकेनं आता मुस्लिमांना एक अजब सल्ला दिला आहे.
KRK Tweet
KRK Tweetesakal

नवी दिल्ली : KRK on Gyanvapi Mosque: सोशल मीडियावर चित्रपट आणि कलाकारांबद्दल अजब-गजब स्टेटमेंट करणाऱ्या कमाल राशीद खान अर्थात केआरकेनं आता मुस्लिमांना एक अजब सल्ला दिला आहे. ज्ञानवापी मशिदीच्या मुद्द्यावर त्यानं भाष्य केलं आहे. (Muslims have to convert Now KRK advice over Gyanvapi Mosque issue)

KRK Tweet
Mumbai Crime: अंधेरीत सेफ्टी टँकमध्ये मृतदेह आढळल्यानं खळबळ; शरिरावरील जखमांमुळं हत्येचा गुन्हा

केआरकेनं ट्विट करुन म्हटलं की, जर सरकारनं ठरवलंच आहे की ज्ञानवापी मशिदीला मंदिर बनवलं जाईल तर सरकारला कोणीही थांबवू शकत नाही. मला वाटतं आता मुस्लिम समाजाला स्वतःचं मशिदीला सरकारच्या हवाली करायला हवं. केआरकेच्या या विधानामुळं त्याला रोषाला सामोरं जावं लागू शकतं. (Marathi Tajya Batmya)

KRK Tweet
Devendra Fadnavis News : ''त्यांनी डोळ्याला पट्टी लावली आहे'' आदित्य ठाकरेंच्या टीकेला फडणवीसांचं प्रत्युत्तर

मुस्लिमांना दिला धर्मांतराचा सल्ला

केआरके आपल्या वादग्रस्त विधानांसाठी ओळखला जातो. यापूर्वी देखील त्यानं मुस्लिमांना धर्मांतराचा सल्ला दिला होता. त्यानं ट्विट केलं होतं की, "मी भारतातील सर्व मुस्लिमांना सल्ला देतो की, त्यांनी धर्मांतर करुन हिंदू बनावं कारण धर्मापेक्षा जास्त जरुरी आपल्या मुलांचं जीवन आहे. अरब देशांसाठी आपण भारतीय मुसलमान धर्मांतरीत झालेले आहोत. आता अरब देश इस्लामचं संरक्षण करु शकत नाहीत. त्यामुळं आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा धर्मांतर करण कोणतीही चुकीची गोष्ट नाही. (Latest Marathi News)

KRK Tweet
Twitter Live : आता 'एक्स'वरील लाईव्ह फीचरमध्ये मोठा बदल; इलॉन मस्कने व्हिडिओ शेअर करत दिली माहिती

रजनीकांतवर टीका करणं पडलं भारी

काही दिवसांपूर्वी केआरकेनं ट्विटरवरुन ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांचा फोटो शेअर करत त्यांचीही खिल्ली उडवली होती. हे केआरकेवर भारी पडलं होतं. त्यांच्या ट्विटनंतर रजनीकांतच्या चाहत्यांनी जोरदार ट्रोल केलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com