रणवीर माझ्यासाठी उर्जेचा स्त्रोत; सोनाली बेंद्रेची आणखी नवी पोस्ट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जुलै 2018

आता सोनालीने मुलगा रणवीर बहल याच्या सोबतचा फोटो आणि आणखी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. 

अभिनेत्री सोनाली बेंद्रे सध्या न्युयॉर्क येथे कॅन्सरचा उपचार घेत आहे. तिच्या आजारपणाविषयी ती सुरवातीपासूनच खुलेपणाने बोलत आली आहे. सोनाली तिच्या इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंटवरुन नवीन पोस्ट शेअर करत असते. तिला कॅन्सर झाला असल्याची माहितीही तिने सोशल मिडीया साइटवरुनच दिली होती. त्यानंतर आजारपणातील 'आव्हान' आणि 'विजय' याविषयीही तिने काही दिवसांपूर्वी लिहीले होते आणि नवीन हेअरकटचा फोटो अपलोड केला होता. आता सोनालीने मुलगा रणवीर बहल याच्या सोबतचा फोटो आणि आणखी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. 

या फोटोत सोनालीचा गेल्यावेळी केलेल्या हेअरकटपेक्षा ही लहान हेअरकट दिसत आहे. या पोस्टमध्ये लिहिल्याप्रमाणे, 'रणवीरचा जन्म झाल्यापासून त्याने माझ्या ह्रद्यावर अधिराज्य गाजवले आहे. मी आणि माझे पती गोल्डी बहल आम्हाला आतापर्यंत त्याचा आनंद आणि त्याचासाठी योग्य गोष्टी यांचे सगळ्यात जास्त महत्त्व राहिले आहे. पण माझ्या आजारपणाविषयी त्याला कसे सांगावे या पेचात आम्ही होतो. जितकं आम्ही त्याला सुरक्षित ठेऊ इच्छितो, दुसऱ्या बाजूला आम्हाला याचीही पुर्ण जाणीव आहे की त्याला सत्य सांगणंही महत्त्वाचं आहे. आम्ही नेहमी त्याच्यासोबत खरे आणि खुलेपणाने वागत आलेलो आहोत. त्याने आजारपणाविषयीची बातमी खुप समजुतदारीने स्वीकारली आहे आणि माझ्यासाठी एक नवीन उर्जा आणि सकारात्मकता त्याने निर्माण केली आहे. आता काही वेळा तर तो पालकांच्या भुमिकेत येऊन मला काय काळजी घ्यायला हवी हे तो आठवण करुन देतो. मला वाटतं की अशी काही परिस्थिती असेल तर आपल्या पाल्याला अशा परिस्थितींमध्ये सामील करुन घेणे आवश्यक असते. ते अशावेळी अधिक संवेदनशील होतात. आपल्या पाल्याला प्रत्येक गोष्टीपासून वेगळं किंवा दूर ठेवल्यापेक्षा त्यांच्यासोबत जास्त वेळ आपण घालवणे महत्त्वाचे असते. मी सध्या रणवीर सोबत वेळ घालवतेय. आम्ही एकमेकांकडून ताकद घेत आहे.'

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

  

 

Web Title: My Son Ranveer is my strength Sonali Bendres new post goes viral