esakal | मी मुस्लिम, पत्नी हिंदू आणि मुले हिंदुस्तानी : शाहरुख
sakal

बोलून बातमी शोधा

ShahRukh Khan

जेव्हा शाळेत फॉर्म भरताना धर्म लिहावा लागतो. तेव्हा माझ्या मुलीने मला विचारले, की आपण कोणत्या धर्माचे आहोत. तेव्हा मी त्यांना सांगितले की आपण भारतीय आहोत.

मी मुस्लिम, पत्नी हिंदू आणि मुले हिंदुस्तानी : शाहरुख

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : माझ्या कुटुंबाला भारताबद्दल खूप प्रेम आहे. आम्ही घरात कधीच हिंदू-मुस्लिम अशी चर्चा करत नाही. मी मुस्लिम आहे, माझी पत्नी हिंदू असून, माझी मुले हिंदुस्तानी आहेत, असे वक्तव्य अभिनेता शाहरुख खान याने केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारताच्या 71 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त स्टार प्लस या वाहिनीवरील एका रिऍलिटी शोमध्ये शाहरुख सहभागी झाला होता. शाहरुखला प्रश्न विचारला असता त्याने हे उत्तर दिले. भारतीय हा शब्द कोणत्याही धर्म व जातीपेक्षा मोठा असल्याचे मत त्याने व्यक्त केले. 

अमेरिकेचा बॉस्केटबॉलपटू कोबी ब्रायंटचा मुलीसह हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू

शाहरुख म्हणाला, की जेव्हा शाळेत फॉर्म भरताना धर्म लिहावा लागतो. तेव्हा माझ्या मुलीने मला विचारले, की आपण कोणत्या धर्माचे आहोत. तेव्हा मी त्यांना सांगितले की आपण भारतीय आहोत. आपल्याला कोणताही धर्म नाही आणि असायलाही नाही पाहिजे. आपण सगळे स्वातंत्र्य आहोत. 

loading image
go to top