esakal | 'नामकरण' फेम अनायाचे दोन्ही किडनी निकामी; उपचारासाठी पैशांची गरज
sakal

बोलून बातमी शोधा

anaya soni

'नामकरण' फेम अनायाचे दोन्ही किडनी निकामी; उपचारासाठी पैशांची गरज

sakal_logo
By
स्वाती वेमूल

स्टार प्लस वाहिनीवरील 'नामकरण' Naamkaran या मालिकेत भूमिका साकारलेली अभिनेत्री अनाया सोनी Anaya Soni आरोग्याच्या समस्यांना तोंड देत असून आर्थिक संकटात आहे. अनायाचं एक मूत्रपिंड निकामी झालं असून त्याच्या उपचारासाठीही पैसे नसल्याचं तिने सांगितलं. 'ई टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत अनायाने तिचं दु:ख मांडलं. "२०१५ पासून मी एकाच मूत्रपिंडावर जगतेय. माझे दोन्ही किडनी सहा वर्षांपासून निकामी झाले होते आणि त्यावेळी बाबांनी मला मूत्रपिंडदान केलं. अचानक त्यांनी दान केलेलं मूत्रपिंडसुद्धा निकामी झालं आणि मला पुन्हा किडनीच्या नव्या प्रत्यारोपणाची गरज आहे", असं तिने सांगितलं. (Naamkaran actress Anaya Soni kidneys fail seeks financial help)

अनायाने 'नामकरण' आणि 'क्राइम पेट्रोल'मध्य काम केलं. रोनित रॉयच्या 'अदालत' या मालिकेतही तिने भूमिका साकारली होती. २०१५ मध्ये तिने 'टेक इट इझी' आणि २०१६ मध्ये 'है अपना दिल तो आवारा' या चित्रपटांमध्येही ती झळकली. आरोग्य ठीक नसतानाही अनाया मिळेल ते काम करतेय. 'रुद्रम्मा देवी' या तेलुगू चित्रपटाचं शूटिंग ती सध्या करतेय. सध्या पैशांची खूप गरज असल्याने मिळेल ते काम करण्याशिवाय पर्याय नसल्याचं ती सांगते.

हेही वाचा: आर्थिक संकटात असलेल्या अभिनेत्रीची माधुरीने केली मदत

"माझी आई कपड्यांचा व्यवसाय करत होती. मात्र घराला आग लागल्यापासून कुटुंबाची परिस्थिती आणखीनच खालावली. सर्वकाही संपून गेलं. आता प्रत्येक दिवशी कमावून खायची परिस्थिती आमच्यासमोर आली आहे", असं ती पुढे म्हणाली. अनायावर सध्या मुंबईतील होली स्पिरिट रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

loading image