Naatu Naatu wins Oscars 2023: भारताला ऑस्कर मिळवुन देणारे M M Keeravani आहे तरी कोण? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Naatu Naatu wins Oscars 2023
M M Keeravani

Naatu Naatu wins Oscars 2023: भारताला ऑस्कर मिळवुन देणारे M M Keeravani आहे तरी कोण?

Naatu Naatu wins Oscars 2023: आज ऑस्कर 2023 सोहळा आज लॉस एंजेलिमधील 'डॉल्बी' थिएटरमध्ये पार पडला आहे.अत्यंत दिमाखदार पद्धतिने हा सोहळा झाला. यावेळी भारतीयांचे लक्षही लक्षही या सोहळ्याकडे होते.

यावेळी भारतातून तीन चित्रपटांनी ऑस्करसाठी दावेदारी सादर केली होती, त्यापैकी RRR ला मधील नाटू नाटू गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग कॅटेगरी मध्ये ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. द एलिफंट व्हिस्पर्सला सर्वोत्कृष्ट लघुपट प्रकारात पुरस्कार मिळाला आहे.

एम एम कीरावानी यांनी भारताला ऑस्कर मिळवुन दिला. त्याच्या सर्वत स्तरावरुन कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र एम एम कीरावानी हे कोण आहेत ज्यांनी ऑस्करपर्यंत मजल मारली ,त्यांनी किती संघर्ष केला हे तुम्हाला माहितीये का?तर हेच जाणून घेवुया.

पूर्ण नाव कोडुरी मारकथमणी कीरावनी हे पुर्ण नाव असेलेले कीरावानी हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिग्गज संगीत दिग्दर्शकांपैकी एक आहेत. आंध्र प्रदेशातील या संगीत दिग्दर्शकानं आता जगाच्या पाठिवर स्वत:चं नावं कोरलं आहे.

त्याचबरोबर प्रसिद्ध तेलगु 'तेलुसा मनसा' हे गाणं ज्याचं क्रिमीनल चित्रपटातील 'तुम मिले दिल खिले'हे रिमेक गाणं आहे हे देखील किरावानी यांनीच संगीतबद्ध केले होते. 1989 पासून आजतागायत एमएम कीरावानी आपल्या गाण्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत.

आरआरआर'पूर्वी साउथसह पुर्ण भारतात डंका वाजवणाऱ्या 'बाहुबली 2' चित्रपटात देखील संगीत दिग्दर्शक म्हणून एमएम कीरावानी यांनी काम केलं आहे. आपल्या संगीताने त्यांनी सर्वांची मने जिंकली आहेत.

आरआरआरचे 'नाटू नाटू' गाणे जगभर प्रसिद्ध होण्यामागे एमएम कीरावानी यांचा मोठा सहभाग आहे आणि आता एमएम कीरावानी हे नाव भारताच्या इतिहासात कोरलं जाईल यात काही शंकाच नाही.

टॅग्स :tollywoodOscars