
Jhund Movie: नागराजच्या 'हलगीनं' पुणेकरांना नाचवलं...
Jhund Movie: नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित झुंड हा चित्रपट आज प्रदर्शित झाला. त्याला मोठया प्रमाणवर चाहत्यांचा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. आज नागराजच्या झुंडचा प्रिमिअर (Bollywood News) पुण्यातील कोथरुडमधील सिटीप्राईड थिएटरमध्ये (Pune Citipride) आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी तिथं त्यानं ज्यापद्धतीनं झुंडचं प्रमोशन केलं त्याचे व्हिडिओ सोशल मीडिय़ावर (Social Media) व्हायरल झाले आहेत. त्याला उपस्थित प्रेक्षकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. केवळ नागराजच नाहीतर अजय अतुलनं देखील यावेळी हजेरी लावली होती. सैराट फेम आकाश ठोसर, रिंकु राजगुरु यांच्या हटके लूकनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. (Bollywood News)
बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh bachchan) यांना घेऊन बॉलीवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या नागराजचा झुंडला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले आहे. यावेळी त्यानं आगळ्या वेगळ्या पद्धतीनं चित्रपटाचं प्रमोशन केल्याचे दिसून आले आहे. हलगीच्या सुरावटीनं त्यानं साऱ्यांना दखल घेण्यास भाग पाडले होते. गेल्या काही दिवसांपासून झुंडने अनेकांची उत्सुकता वाढवली होती. बॉलीवूडमधील मोठमोठ्या सेलिब्रेटींनी देखील नागराजच्या झुंडची दखल घेत त्याच्याप्रती कौतूकाचा वर्षावर व्यक्त केला होता. यामध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि साऊथचा सुपरस्टार धनुष यांनी नागराजचं अभिनंदन केलं आहे. त्यानं जे काही तयार केलं आहे त्याला मास्टरपीस म्हणता येईल. अशा शब्दांत धनुषनं आपली प्रतिक्रिया दिली होती.
मराठीतील प्रसिद्ध अभिनेता जितेंद्र जोशीनं खास व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केला आहे. त्यामध्ये त्यानं नागराजचं तोंडभरून कौतूक केल्याचे दिसून आले आहे. नागराजनं आम्हाला खूप चांगली कलाकृती दिली असून त्याबद्दल त्याचे कौतूक करायला हवे. समाजातील गंभीर प्रश्न त्यानं प्रभावीपणे मांडल्याबद्दल आम्ही त्याचे आभारी आहोत असे जितेंद्र जोशीने म्हटले आहे. प्रख्यात अभिनेता सुबोध भावेनं देखील नागराजच्या पहिल्या हिंदी चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा: Jhund Movie Review: प्रवाहाबाहेरील टीमची व्यवस्थेला 'कीक'
Web Title: Nagraj Manjule Jhund Movie Promotion Pune Kothrud Halgi Video Viral
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..