'यंदाच्या ऑस्करशी माझंही कनेक्शन..' नागराज मंजुळेच्या पोस्टनं वेधलं लक्ष Nagraj Manjule On Oscar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagraj Manjule On Oscar

Nagraj Manjule On Oscar: 'यंदाच्या ऑस्करशी माझंही कनेक्शन..' नागराज मंजुळेच्या पोस्टनं वेधलं लक्ष

Nagraj Manjule On Oscar: प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळेची एक पोस्ट सध्या भलतीच चर्चेत आहे. नागराजनं ही नवी पोस्ट .यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याविषयी केली आहे. त्यानं या पोस्टमध्ये यंदाच्या ऑस्करशी माझंही कनेक्शन असं म्हटल्यानं जो-तो उत्सुकतेपोटी ही पोस्ट वाचतोय.

आणि नागराजला लवकरच ऑस्करही मिळेल अशा शुभेच्छा लोक देताना दिसत आहेत. चला जाणून घेऊया या पोस्टविषयी सविस्तर.(Nagraj Manjule On Oscar speak about his connection to oscar 2023 Post viral)

यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. आणि चक्क एक नाही तर ऑस्करच्या दोन गाोल्डन बाहुल्या भारताकडे आल्या. 'द एलिफंट व्हिस्पर्स' या शॉर्टफिल्मनं आणि आरआरआर च्या 'नाटू नाटू' गाण्यानं ऑस्कर पटकावत भारताचा सम्मान वाढविला आहे.

कालपासनं मनोरंजनसृष्टीतच नव्हे तर सर्वसामान्य लोकांच्या मनातही आनंदाचा पूर आलेला पहायला मिळत आहे. भारताकडे दोन ऑस्कर पुरस्कार आल्यानंतर केवळ मनोरंजन सृष्टीनं नाही तर सर्वसामान्य भारतीयांनीही पुरस्कार विजेत्या टीमचे कौतूक केले आहे.

नागराज मंजुळेनं देखील यंदाच्या ऑस्करशी खास कनेक्शन आहे हे सांगत लोकांमध्ये उत्सुकता निर्माण केली. ऑस्कर विनिंग शॉर्टफिल्म 'द एलिफंट व्हिस्पर्स'ची एडिटर संचारी ही नागराजची मैत्रिण आहे..त्याचा 'नाळ' सिनेमाही तिनंच एडिट केला होता.

तर 'नाटू नाटू' गाण्याचा गीतकार चंद्रबोस यानेच नागराजच्या 'घर बंदूक बिर्यानी' मधील गुन गुन गाण्याचे तेलुगु बोल लिहिले आहेत. म्हणजे विजेते नागराजच्या मित्रपरिवारातलेच आहेत..आणि हेच आहे त्याचे यंदाच्या ऑस्करशी आणि त्याच्या विजेत्यांशी खास कनेक्शन..

हेही वाचा: देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

''या वर्षीचा ऑस्कर विजेता भारतीय माहितीपट elephant whisper माझी मैत्रीण संचारीनं एडिट केला आहे. 'नाळ' ही संचारीनंच एडिट केली आहे. सुधाकर आणि संचारी खूप खूप प्रेम आणि सदिच्छा.विशेष म्हणजे नाटू नाटू गाण्याचा गीतकार चंद्रबोस यांनीच GBB मधल्या गुन गुन गाण्याचे तेलगू बोल लिहले आहेत..यावेळच ऑस्कर कनेक्शन असं आहे''.

चांगभलं !