Nagraj Manjule: नागराज मंजुळेंसोबत काम करायचयं मग.. या अटी पूर्ण करा आणि सिनेमात चमका

आता नागराज मंजुळेंच्या सिनेमात काम करण्यासाठी नवोदीत कलाकारांना सुवर्णसंधी मिळणार आहे.
nagraj manjule upcoming film khashaba marathi movie audition details inside golden opportunity to work with him
nagraj manjule upcoming film khashaba marathi movie audition details inside golden opportunity to work with himSAKAL

Nagraj Manjule Khashaba News: नागराज मंजुळे यांचे सिनेमे पाहणं ही प्रेक्षकांसाठी पर्वणी असते. फँड्री असो सैराट असो वा झुंड. नागराज मंजुळेंचे सिनेमे मनोरंजनासोबत प्रेक्षकांच्या डोळ्यात अंजन घालण्याचं काम करत असतात.

नागराज मंजुळेंच्या सिनेमात आजवर आकाश ठोसर, रिंकु राजगुरु पासुन ते बॉलीवुडचे शहेनशाह अमिताभ बच्चन पर्यंत अनेक कलाकारांनी काम केलंय.

नागराज मंजुळेंच्या सिनेमात काम करणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. आता नागराज मंजुळेंच्या सिनेमात काम करण्यासाठी नवोदीत कलाकारांना सुवर्णसंधी मिळणार आहे.

(nagraj manjule upcoming film khashaba marathi movie audition details inside golden opportunity to work with him)

nagraj manjule upcoming film khashaba marathi movie audition details inside golden opportunity to work with him
Colors KKK 13 : खतरो के खिलाडी 13 च्या सेटवर शिव ठाकरे गंभीर जखमी, हाताला टाके, बघा काय घडलं

नागराज मंजुळेंच्या आगामी खाशाबा सिनेमाची तयारी करत आहेत. झुंड सिनेमानंतर नागराजच्या या आगामी मराठी सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे.

आता या सिनेमात नवोदीत कलाकारांना काम करण्याची नामी संधी मिळणार आहे. नागराज यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करुन ईच्छुक कलाकारांना ऑडीशन देण्याचं आवाहन केलंय.

nagraj manjule upcoming film khashaba marathi movie audition details inside golden opportunity to work with him
Vaidehi Parshurami केसांची वेणी, दिसायला सौंदर्याची राणी

अशी द्या ऑडीशन

नागराज मंजुळेंनी पोस्ट केलीय की.. *जिओ स्टुडिओज आणि आटपाट निर्मित* खाशाबा. चित्रपट ऑडिशन. दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे.. फक्त मुलांसाठी.. वयोगट - ७ ते २५ वर्षे.. मराठी भाषा तसंच माती आणि मॅटवरची कुस्ती येणं आवश्यक.

पाच फोटो ( त्यातील 3 फोटो शरीरयष्टी दाखवणारे).. ३० सेकंदाचा कुस्ती खेळताना व्हिडीओ... ३० सेकंदाचा स्वतःची थोडक्यात माहिती सांगणारा व्हिडीओ... फॉर्म भरण्याची अंतिम मुदत २० जुलै.. अशी पोस्ट नागराज मंजुळेंनी केलीय.

नागराज आणि खाशाबा

फँड्री, सैराट, नाळ, झुंड अशा चित्रपटांमधून मराठी प्रेक्षकांच्या मनावर वेगळीच छाप उमटविणाऱ्या नागराज मंजुळेनी काहीच दिवसांपूर्वी खाशाबा सिनेमाची मोठी घोषणा केली.

नेहमीच सातत्यानं वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या नागराजनं खाशाबा निमित्ताने मोठं शिवधनुष्य हाती घेतलं आहे.

ख्यातनाम पैलवान खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर नागराज मंजुळे चित्रपट निर्मिती करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पण केवळ निर्मितीच नाही तर नागराज आता खाशाबाचं दिग्दर्शन सुद्धा करणार आहेत.

खाशाबा सिनेमाची घोषणा

काहीच दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील उमळवाडमध्ये महाशिवरात्री निमित्त कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते.

त्याला नागराज मंजुळे यांनी हजेरी लावली होती.यावेळी नागराज मंजुळे यांनी खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमाची घोषणा केली होती.

कुस्तीमध्ये देशाला पहिले ऑलम्पिक पदक मिळवून देणाऱ्या आणि जागतिक दर्जाचे पैलवान राहिलेल्या खाशाबा जाधव यांचे व्यक्तिमत्व नागराज आता खाशाबा चित्रपटाच्या निमित्तानं लवकरच प्रेक्षकांसमोर आणणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com