नागराज-रितेशच्या कलाकृतीतून साकारणार शिवरायांची महागाथा!

टीम ईसकाळ
Wednesday, 19 February 2020

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सर्वांनाच आनंदाचा धक्का दिला आहे. मंजुळे, रितेश देशमुख आणि अजय-अतुल महाराजांची यशोगाथा रूरपेरी पडद्यावर झळकावण्यासाठी सज्ज आहेत. 

नागराज यांचे चित्रपट म्हणजे चाहत्यांसाठी पर्वणी असते अन् त्यातही शिवाजी महाराजांवरील चित्रपट म्हणजे मराठी माणसासाठी जीव की प्राण! शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा आणि ती मोठ्या पडद्यावर साकारण्यासठी नागराज यांनी उचलेलं पाऊल हे ऐतिहासिक ठरणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सर्वांनाच आनंदाचा धक्का दिला आहे. मंजुळे, रितेश देशमुख आणि अजय-अतुल महाराजांची यशोगाथा रूरपेरी पडद्यावर झळकावण्यासाठी सज्ज आहेत. 

Shivjayanti 2020 : छत्रपती शिवाजी महाराज स्मारकावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

नागराज मंजुळे यांनी आज शिवजयंतीच्या मुहूर्तावर चित्रपटाची घोषणा केली. ट्विटिरवर एक व्हिडिओ शेअर करत नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. नागराज मंजुळे शिवाजी महाराजांवरील तीन चित्रपटांची मालिका घेऊन येत आहेत. त्यांनी ट्विटमध्ये म्हणले आहे की, 'एखाद्या स्वप्नाच्या उंबरठ्यावर उभं राहणं म्हणजे हेच असावं कदाचित...आज शिवरायांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने हे सांगायला लय आनंद वाटतोय की रितेश देशमुख, अजय-अतुल यांच्या सोबतीने घेऊन येतोय शिवत्रयी - शिवाजी, राजा शिवाजी, छत्रपती शिवाजी शिवरायांच्या जन्मदिनाच्या खूप साऱ्या सदिच्छा.' 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या ट्विटमध्ये नागराज यांनी चित्रपटाच्या घोषणेचा टीझर पोस्ट केला आहे. रितेश देशमुख यांचेही नाव या टीझरमध्ये दिसते. मात्र ते अभिनयासाठी, दिग्दर्शनासाठी की निर्माते म्हणून हे अजून स्पष्ट झालेले नाही. तर अजय-अतुल यांचं संगीत या यशोगाथेला असेल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagraj Manjule will direct 3 movies on Shivaji Maharaj