Namrata Malla: प्रसिद्ध अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर! वडिलांचे निधन

Namrata Malla Father
Namrata Malla Father Esakal

भोजपुरी मनोरंजन विश्वातील अभिनेत्री नम्रता मल्लावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. नम्रता मल्लच्या वडिलांचे निधन झाले असून अभिनेत्रीने स्वत: तिच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे.

Namrata Malla Father
AR Rahman Video: एआर रहमानने पुणे पोलिसांचे कान टोचले! शो बंद केल्याच्या कृतीची तुलना करत म्हणाले,..

अलीकडेच नम्रताने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्रीने तिच्या वडिलांसोबतचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आणि लिहिले, "मी अत्यंत दुःखाने माझे वडील श्री कृष्ण मल्ला यांचे काल रात्री निधन झाल्याची माहिती देत आहे. मी तुम्हा सर्वांना विनंती करते की तुम्ही त्यांच्या पवित्र आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करा. ओम शांती.."

Namrata Malla Father
Salman Khan: 'तू घाबरु नकोस'! उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणतात, 'सलमान मुंबईपेक्षा सुरक्षित...'

नम्रता मल्ला तिच्या वडिलांच्या आकस्मिक निधनाने तिच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. तिने सोशल मीडियावर तिची व्यथा व्यक्त करणारा एक अतिशय भावनिक संदेश लिहिला आहे. तिची ही पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. त्यानंतर तिचे चाहते तिला धीर देत आहेत. या कठिण प्रसंगी तिला कुटूंबाचा आधार होण्यासाठी सांगत आहे.

नम्रता मल्लाचे वडील व्हेंटिलेटरवर होते. ते यकृताशी संबंधित समस्यांमुळे त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांनी घाईगडबडीत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. स पोस्ट शेअर करताना नम्रताने याची माहिती दिली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com