तिरंगा चित्रपटासाठी नाना पाटेकरांची होती एकच अट, ती म्हणजे...

मेहूल कुमार यांनी सांगितले,
raj kumar and nana patekar
raj kumar and nana patekar Team esakal

मुंबई - बॉलीवूडमध्ये (bollywood) अशा काही कलाकृती तयार झाल्या आहेत त्यांचा चाहत्यांचा मनावर प्रभाव कायम आहे. तिरंगा हा चित्रपट अशीच एक कलाकृती म्हणावी लागेल. या चित्रपटाची क्रेझ अद्याप कायम आहे. त्यातील कलाकार, कथा, कलाकारांच्या तोंडचे संवाद, दिग्दर्शन यासगळ्याची चर्चा होत होती. प्रसिद्ध कलाकार नाना पाटेकर (nana patekar) आणि राज कुमार (raj kumar) या दोन्ही प्रतिभावंत कलाकारांनी त्यात अभिनय केला होता. त्यांच्यातील वादही त्यावेळी मोठ्या प्रमाणात गाजले होते. (nana patekar told raaj kumar interferes he will immediately leave the tirangaa set)

त्याचं झालं असं, तिरंगा (tiranga) या चित्रपटाचे दिग्दर्शक मेहूल कुमार यांनी एका मनोरंजन चॅनेलला मुलाखत दिली. त्यात त्यांनी तिरंगा चित्रपटाची निर्मिती आणि काही गंमती जमती सांगितल्या होत्या. मेहूल कुमार यांनी सांगितले, मी जेव्हा माझ्या या चित्रपटासाठी नानाला अॅप्रोच झालो होतो तेव्हा त्यांनी सांगितले, मी व्यावसायिक सिनेमे करत नाही. आणि त्यांनी तिरंग्याची ऑफर नाकारली होती. नानानं ही ऑफर नाकारणं माझ्यासाठी मोठा धक्का होता.

प्रख्यात अभिनेता राज कुमार आणि नाना पाटेकर पहिल्यांदाच एकत्रितपणे चित्रपटात काम करणार होते. मात्र ज्यावेळी या दोन्ही अभिनेत्यांना सांभाळण्याची जबाबदारी मेहूल कुमार यांच्यावर आली तेव्हा त्यांना मोठ्या संकटाला सामोरं जावं लागलं होतं. त्यांनी याबाबत त्या मुलाखतीमध्ये खुलासा केला आहे. नानानं जेव्हा तिरंग्याची ऑफर नाकारली होती तेव्हा कुमार यांनी ती स्क्रिप्ट राज यांनाही ऐकवली होती. नानानं स्क्रिप्ट वाचून आपण हा चित्रपट करणार असल्याचे सांगितले.

raj kumar and nana patekar
'मुलगी झाली हो'मधील 'ही'अभिनेत्री घेणार मालिकेचा निरोप

जेव्हा आपण हा चित्रपट करण्यास तयार असल्याचे नानानं सांगितलं तेव्हा त्यांनी मेहूल कुमार यांच्यासमोर एक अट ठेवली. ती म्हणजे आपल्या कामात राज कुमार यांनी हस्तक्षेप करायचा नाही. तसे झाले तर आपण चित्रपटाच्या सेटवरुन निघुन जाऊ. त्यावेळी मेहूल यांनी नानांना विश्वास दर्शवत राज कुमार कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करणार नाही. असे सांगितले. नाना आणि राज हे शुटिंगच्या दरम्यान एकमेकांशी बोलत नसायचे. एकमेकांसमोर असूनही त्यांनी त्यावेळी बोलणं टाळलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com