
'दिशा सलियन,सुशांत सिंह राजपूत आत्महत्या नाही हत्याच';नवा खळबळजनक दावा
दिशा सलियन(Disha Salian) आणि सुशांत सिंह राजपूत(Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरणात केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा काही खळबळजनक दावे केले आहेत. खरंतर राणे कुटुंबियांकडून आधीपासूनच दिशा सलीयनच्या आत्महत्या प्रकरणावर अनेक प्रश्न निर्माण केले गेले होते. तीनं आत्महत्या केली नसून ती हत्या होती,तसंच ती प्रेग्नंट होती आणि प्रेग्नंट असल्यामुळे तिची हत्या केली गेली. आणि ती एका पार्टीमध्ये झाली. पार्टीमध्ये तिच्यावर बलात्कारही करण्यात आला अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे आरोप नारायण राणे आणि त्यांच्या कुंटुंबियांकडून खासकरून नितेश आणि निलेश राणे या नारायण राणेंच्या दोन मुलांकडून वारंवार केले जात होते. त्यासाठी पत्रकार परिषही घेण्यात आली होती. पण आता नारायण राणे यांनी नुकत्याच मुंबईत झालेल्या एका पत्रकार परिषदेत या सर्व गोष्टींचा पुन्हा उल्लेख केला. त्यांनी अनेक सवाल कालच्या पत्रकार परिषदेत उठवले आहेत.
हेही वाचा: ना सप्तदीचे सूर,ना कबूल है चं वचन,मग फरहान-शिबानी कसं करणार लग्न? वाचा
''दिशा सलियनवर बलात्कार होत असताना त्या फ्लॅटबाहेर कोणत्या मंत्र्याचे सुरक्षारक्षक पहारा देत होते?..'' असा सवाल करीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आता या प्रकरणाला नव्यानं वाचा फोडली आहे. ८ जूनला दिशा सलियनची हत्या झाली होती. जेव्हा सुशांतला या सर्व प्रकरणाविषयी कळले तेव्हा त्यानं आवाज उठवण्याचं ठरवलं. पण म्हणूनच त्याचीही हत्या करून त्याला शांत करण्यात आल्याचा दावा नारायण राणे यांनी केला आहे. यावेळी त्यांनी दिशा सलियन आणि सुशांत सिंह राजपूत प्रकरणाविषयी आणखी नवे खुलासे केले. पण या प्रकरणावर पोलिसांकडून मात्र वेगळाच निर्णय याआधीच घेण्यात आला आहे. काय म्हणतायत दिशा सलियन प्रकरणातले तपास अधिकारी?
हेही वाचा: मुंबई महानगरपालिकेच्या विरोधात की समर्थनार्थ?केदार शिंदेचं ट्वीट चर्चेत
पोलिसांनी आता स्पष्ट केलं आहे की या वर्षाच्या सुरुवातीला दिशा सलियन ही केस कोणतेही आरोप सिद्ध न झाल्यामुळे तसंच पुराव्यां अभावी बंद करण्यात आली आहे. तपास अधिकाऱ्यांनी या केसची सखोल चौकशी केली पण कोणातेही आरोप सिद्ध झाले नाहीत. दिशा सलियन कोणत्याही पार्टीला उपस्थित राहिली नव्हती. ती प्रेग्नंट नव्हती, ना तिची हत्या झाली आहे. तसंच,तिनं आत्महत्या केली त्या रात्री कोणतीही पार्टी झाली नव्हती. आता दिशा सलियनची हत्या न झाल्याच्या निष्कर्षापर्यंत तपास अधिकारी पोहोचले आहेत. तसंच यामध्ये कोणत्याही राजकीय नेत्याचा हात नाही हे देखील पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसंच,दिशा सलियन ही सुशांत सिंह राजपूतचं काम पाहत होती पण मॅनेजर नव्हती. तिचा आणि सुशांत सिंहच्या मृत्यूचा कोणताही संबंध नाही हे देखील तपास अधिकाऱ्यांच्या अहवालात नमूद केले गेले आहे.
हेही वाचा: बॉलीवूडच्या शहनशाहला बाहुबलीची पडली भुरळ; पोस्टमध्ये चक्क म्हणालेयत...
दिशा सलियन मृत्यू प्रकरणाचा तपास पोलिसांकडून बंद करण्यात आल्यामुळे आता नारायण राणे यांनी थेट ठाकरे सरकारला आव्हान देत म्हटलं आहे की,''आम्ही ही केस पुन्हा उभी करू,कोर्टात न्याय मागू पण शांत बसणार नाही. ठाकरे सरकारला दिशा सलियन,सुशांत सिंह राजपुत संदर्भातल्या अनेत अनुत्तरीत राहिलेल्या प्रश्नांचे उत्तर द्यावेच लागेल'', असंही केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
Web Title: Narayan Rane Over Sushant Singh Rajputs Former Manager Disha Salians Death
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..