मुंबई महानगरपालिकेच्या विरोधात की समर्थनार्थ?केदार शिंदेचं ट्वीट चर्चेत

'मुंबईकरांच्या समस्येवर आपण तरी बोलूया, इतरांचं वेगळंच चाललंय..' म्हणत केदार शिंदेनं ट्वीटरवर चर्चासत्र सुरू केलं आहे.
Kedar Shinde
Kedar ShindeGoogle

दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) हा मराठीतला एक उत्तम दिग्दर्शक आहे. त्यानं अनेक चांगली नाटकं,मालिका,सिनेमे केले आहेत. तो आपल्या प्रत्येक कलाकृतीमधून सामाजिक विषय मांडताना आतापर्यंत दिसला आहे. मग अगदी तो विषय कधी शहराकडचा असेल तर कधी गावाकडचा. तो विषय आपल्या विनोदी शैलीत हलका-फुलका करुन त्यानं सर्वांपर्यंत तो पोहोचवण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. छोट्या पडद्ययावरील त्याची 'हसा चकट फू' मालिका तर भन्नाट. त्यातनं कौटुंबिक विषय हाताळले गेले असले तरी अनेकदा सामाजिक भूमिकाही त्यातनं मांडली जायची.

केदार सोशल मीडियावरही तितकाच सक्रिय असतो. सध्या त्याचं एक ट्वीट पुन्हा चर्चेत आलं आहे. त्यानं त्या ट्वीटमधनं मुबंईकरांना आवाहन केलंय जे थोडं मुंबई महानगरपालिकेला(Mumbai Munciplal Corporation) आव्हान केल्यासारखं भासत आहे. त्यानं हे ट्वीट आगामी मुंबई महानगपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलं आहे. तंस त्यानं त्या ट्वीटमध्ये नमूद केलंय. त्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे,''कधीही मुंबई मनपा निवडणूक बिगूल वाजेल... मुंबईकर म्हणून कोणकोणत्या समस्या आपल्यापुढे उभ्या आहेत?? Comments मधे चर्चा अपेक्षित. किमान आपण तरी याविषयी बोलूया... बाकी इतर खुप वेगळं बोलतायत. #मुंबई #मुंबईमहानगरपालिका''

Kedar Shinde
बॉलीवूडच्या शहनशाहला बाहुबलीची पडली भुरळ; पोस्टमध्ये चक्क म्हणालेयत...

या त्याच्या ट्वीटवर मुंबईकरांच्या प्रतिक्रियांचा मात्र पाऊस पडलेला पहायला मिळत आहे. मुंबई महानगरपालिकेकडून कोणत्या अपेक्षा मुंबईकरांना आहेत याची थेट चर्चाच ट्वीटरवर रंगलेली पहायला मिळत आहे. आता सध्यातरी या चर्चेत मुंबईकरांच्या महानगरपालिकेकडून असलेल्या अपेक्षाच पहायला मिळत आहेत,पण त्यातून कुठला वाद, मुद्दा रंगला नाही म्हणजे मिळवलं. कारण तसं जर झालं तर केदार शिंदे मात्र अडचणीत येऊ शकतो शंभर टक्के.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com