एन्गेजमेंटच्या फोटोवर नताशाच्या एक्स-बॉयफ्रेंडने केली कमेंट!

टीम ई-सकाळ
गुरुवार, 2 जानेवारी 2020

'नच बलिये' या रिअॅलिटी शोच्या सेटवर नताशा आणि अलीची भेट झाली होती. नच बलियेच्या नवव्या सीझनमध्ये नताशा-अली या जोडीला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते.

गेल्या दोन दिवसांपासून भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्याची गर्लफ्रेंड आणि बॉलिवूड अभिनेत्री नताशा स्टॅन्कोविकशी दुबईत एन्गेजमेंट केल्यानंतर या चर्चेला आणखी उधाण आले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

साखरपुडा उरकल्यानंतर गुरुवारी (ता.2) हे कपल दुबईहून मुंबईला परतले. या एन्गेजमेंटचे फोटो दोघांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केले आहेत. यानंतर नताशाच्या एक्स-बॉयफ्रेंडने यावर आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. नताशाचा पूर्वाश्रमीचा प्रियकर असलेल्या अली गोनीनं या दोघांच्या एन्गेजमेंटच्या फोटोवर प्रतिक्रिया देताना हार्ट इमोजी पोस्ट केल्या आहेत. 

- नताशा वहिनीचं स्वागत करताना कृणाल म्हणाला, 'वेडेपणा करण्यासाठी...'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Forever yes @hardikpandya93

A post shared by Nataša Stanković (@natasastankovic__) on

'नच बलिये' या रिअॅलिटी शोच्या सेटवर नताशा आणि अलीची भेट झाली होती. नच बलियेच्या नवव्या सीझनमध्ये नताशा-अली या जोडीला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. अली आणि नताशा अनेक महिने रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, नच बलियेच्या दरम्यान त्यांचे ब्रेकअप झाले. त्यामुळे त्यांना नच बलियेच्या सेटवरील 'एक्स कपल' असेही म्हटले जात होते.   

- आलियाने केलाय 'बेस्ट बॉईज'चा फोटो शेअर; कोण आहेत हे दोघं?

'डीजे वाले बाबू' या गाण्यामुळं नताशा प्रसिद्धीच्या झोतात आली. त्यानंतर सत्याग्रह (2013), फुकरे रिटर्न्स (2017) या चित्रपटांतही तिने छोट्या भूमिका साकारल्या आहेत. डॅडी (2017)मध्ये तिने एक आयटम साँगही केले आहे. तसेच बिग बॉसच्या आठव्या सीझनमध्येही नताशा सहभागी झाली होती. तसेच 2018 मध्ये आलेल्या अभिनेता शाहरुख खानच्या बहुचर्चित 'झीरो' या चित्रपटात नताशाने काम केले आहे.

- Photo : मराठी अभिनेत्रीने केले 'लिपलॉक'; बघा!

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Mai tera, Tu meri jaane, saara Hindustan. 01.01.2020 #engaged

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93) on


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Natasa Stankovic Ex boyfriend Aly Goni reacted after her engagement with Hardik Pandya