नाथ पै एकांकिका स्पर्धेत इस्लामपूर प्रथम 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

कणकवली - वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या 41 व्या नाथ पै एकांकिका स्पर्धेच्या खुल्या गटात इस्लामपूरच्या राजाराम बापू इन्स्टिट्यूटची "कस्तुरा' ही एकांकिका प्रथम आली. मुंबईच्या पाटकर वर्दे महाविद्यालयाची "पैठणी' या एकांकिकेने द्वितीय, तर कोल्हापुरच्या शिंदे अकादमीची "हात धुवायला शिकवणारा माणूस' एकांकिकेने तृतीय क्रमांक पटकावला. 

खुल्या आणि शालेय गटातील विजेत्या संघांना अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे नियोजित अध्यक्ष व ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी, स्पर्धेचे परीक्षक व लेखक प्रा. डॉ. अविनाश कोल्हे, अभिनेते किरण माने यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी आचरेकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष वामन पंडित, प्रा. अनिल फराकटे, शरद सावंत आदी उपस्थित होते. 

उर्वरीत निकाल : दिग्दर्शन : प्रथम - सुशांत घाटगे (राजाराम बापू इन्स्टिट्यूट, इस्लामपूर), द्वितीय - प्रथमेश पवार (वर्दे महाविद्यालय मुंबई) आणि तृतीय क्रमांक सुनील शिंदे (शिंदे अकादमी कोल्हापूर).

तांत्रिक अंगे : प्रथम - "कस्तुरा' राजाराम इन्स्टिट्यूट इस्लामपूर, द्वितीय - "हात धुवायला शिकवणारा माणूस', शिंदे अकादमी कोल्हापूर आणि तृतीय - "अनाहूत' श्रीसमर्थ कलाविष्कार ग्रुप देवगड. 

अभिनय : प्रथम - ऋषिकेश जाधव (कस्तुरा), द्वितीय - दुर्गेश बुधकर (चुरगळ) आणि तृतीय - स्मितेज कदम (अपूर्णांक).

अभिनय स्त्री : प्रथम - ज्ञानदा खोत (पैठणी), द्वितीय - श्रृतकिर्ती सावंत (कस्तुरा), तृतीय - रूपाली परब (तुमच्या मायला).

उत्तेजनार्थ - गागर्डी होगडमल (आजी), अक्षता सावंत (चुरगळ). 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nath Pai Drama competition