esakal | Bhonga Teaser: प्रार्थना महत्त्वाची की प्रार्थनेचा आवाज?
sakal

बोलून बातमी शोधा

Bhonga Teaser: प्रार्थना महत्त्वाची की प्रार्थनेचा आवाज?

Bhonga Teaser: प्रार्थना महत्त्वाची की प्रार्थनेचा आवाज?

sakal_logo
By
स्वाती वेमूल

राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त 'भोंगा' Bhonga या चित्रपटाने चित्रपट प्रदर्शनापूर्वीच चांगलीच प्रसिद्धी मिळविली. या चित्रपटाच्या पोस्टरने सोशल मीडियावर प्रेक्षकांचेही लक्ष वेधून घेतले. ध्वनी प्रदूषण कमी करण्यावर या चित्रपटात जोर दिला असून या पार्श्वभूमीवर हा 'भोंगा' चित्रपट चित्रित करण्यात आला आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. धर्मापेक्षा मोठं कोणी नाही, मग कोणाच्या जीवाला धोका असला तरी चालेल या वृत्तीला दडपून टाकण्यासाठी गावकऱ्यांचे प्रयत्न यात दाखवण्यात आले आहेत. अत्यंत आशयघन विषय यात मांडण्यात आला आहे. चित्रपटाच्या टीझरने कथेविषयीची उत्सुकता आणखीनच ताणली आहे. (national award winner marathi film bhonga official teaser slv92)

या चित्रपटाची निर्मिती शिवाजी लोटन पाटील, अर्जुन महाजन, अमोल कागणे यांनी केली असून या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी सांभाळली. यामध्ये अभिनेत्री दिप्ती धोत्रे आणि अभिनेता कपिल गडसुरकर, अमोल कागणे, श्रीपाद जोशी, आकाश घरत, दिलीप डोंबे, सुधाकर बिराजदार, अरुण गीते, महेंद्र तिसगे, रमेश भोळे, दिपाली कुलकर्णी या कलाकारांचे अभिनय पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा: 'माझा होशील ना'मध्ये नवीन ट्विस्ट; आदित्य देसाई विरुद्ध आदित्य देसाईचा सामना

'भोंगा' चित्रपटाची कथा ही अझान भाष्य करणारी आहे. कुटुंबातील नऊ महिन्यांच्या बाळाला Hypoxic Ischemic Encephalopathy हा दुर्धर आजार झालेला असतो. या आजाराला उच्च ध्वनीचा त्रास अधिक होतो. अझानच्या भोंग्यामुळे या बाळाच्या तब्येतीवर सतत परिणाम होऊन बाळाचा त्रास वाढतच जातो. बाळाला होणारा त्रास संपूर्ण गाव पाहतो आणि हा त्रास थांबवण्यासाठी नेमके कोणते प्रयत्न गावकऱ्यांकडून आणि बाळाच्या कुटुंबीयांकडून केले जातात अथवा चित्रपटात नेमके काय घडते याची थोडीशी कल्पना टीझर पाहून येते. हा चित्रपट येत्या २४ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.

loading image