National Film Award 2022 : 'गोष्ट एका पैठणीची' ठरला उत्कृष्ट मराठी सिनेमा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

gosh eka paithanichi
National Film Award 2022 : 'गोष्ट एका पैठणीची' ठरला उत्कृष्ट मराठी सिनेमा

National Film Award 2022 : 'गोष्ट एका पैठणीची' ठरला उत्कृष्ट मराठी सिनेमा

नवी दिल्ली : ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची राजधानी दिल्लीत शुक्रवारी घोषणा झाली. यामध्ये 'गोष्ट एका पैठणीची' या चित्रपटाला 'उत्कृष्ट मराठी सिनेमा'चा पुरस्कार मिळाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शंतून गणेश रोडे यांचे असून प्लॅनेट मराठीने त्याची निर्मिती केली आहे. (National Film Award 2022 Goshta Eka Paithnichi became the best Marathi movie)

या चित्रपट पुरस्कारामध्ये मराठी चित्रपट आणि कलाकारांनी महत्वाचे पुरस्कार पटकावले. यामध्ये अभिनेत्री सायली संजीव आणि अभिनेता शशांक केतकर यांच्या 'गोष्ट एका पैठणीची' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला. त्याचबरोबर 'मी वसंतराव' या चित्रपटासाठी राहुल देशपांडे यांनी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायनाच पुरस्कार जाहीर झाला आहे.

त्याचबरोबर गोदाकाठ आणि अवांछित या दोन मराठी चित्रपटांसाठी किशोर कदम यांना विशेष ज्युरी पुरस्कार मिळाला. तर जून या नेहा पेंडसे निर्मित चित्रपटाला मराठीतील उत्कृष्ट फीचर फिल्मचा पुरस्कार जाहीर झाला. तर नॉन फीचर्स विभागात कुंकूमार्चन या चित्रपटाला बेस्ट फिल्म ऑन फॅमिली व्हॅल्यू हा पुरस्कार मिळाला.

टॅग्स :ManoranjanDesh news