Navardev B.Sc Agri Trailer: "शेतकरी ब्रँड म्हणून जन्माला येईल", डोळ्यात पाणी आणणारा 'नवरदेव'चा ट्रेलर बघाच

शेतकरी राजाची गोष्ट सांगणारा नवरदेवचा ट्रेलर बघाच
navardev marathi movie trailer kshitish date priyadarshini indalkar pravin tarde
navardev marathi movie trailer kshitish date priyadarshini indalkar pravin tardeSAKAL

Navardev B.Sc Agri Trailer News: गेल्या अनेक दिवसांपासून 'नवरदेव (Bsc Agri)’ सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. शेतकरी राजाची गोष्ट सिनेमातून मांडण्यात येणार आहे. शेतकरी राजाची मातीशी असणारी घट्ट नाळ, त्याच मातीतून पीक उगवण्याची तळमळ आणि त्याच शेतीमुळे त्याचं न जमणारं लग्न... याच विषयाला हा चित्रपट हात घालणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय.

navardev marathi movie trailer kshitish date priyadarshini indalkar pravin tarde
Annapoorani Controversy: 'अन्नपूर्णी' विरोधात मुंबईत विश्व हिंदू परिषद आक्रमक, झेंडे फडकावत केला निषेध

आपला अन्नदाता म्हणजेच शेतकरी, तंत्रज्ञानाने कितीही विकसित झाला, कितीही प्रगत शेती केली, तरीही आज त्याला लग्नासाठी मुलगी मिळणं अवघड झालंय.

चित्रपटातील तरूण शेतकरी गावकऱ्यांना एकत्र करुन प्रगत शेती करतोय, जिद्दीने लढायला शिकवतोय. मात्र, असे असूनही नवरीचे आई-वडिल नोकरदार मुलांनाच आपल्या मुली देऊ इच्छितात.

या सगळ्या अडचणींवर मात करत, शेतकरी राजवर्धन नवरीच्या मनात मळा फुलवणार का हे थिएटरमध्ये जाऊनच बघावं लागेल!

'नवरदेव (Bsc Agri)’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय. या दमदार ट्रेलरला प्रेक्षकांचा प्रतिसादही चांगलाच मिळतोय.

तरूण शेतकऱ्याच्या भूमिकेतील क्षितीश दाते पहिल्यांदाच प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. तर त्याच्या साथीला प्रियदर्शिनी इंदलकर, नवरी म्हणून त्याला मिळणार की नाही, हे चित्रपटगृहात जाऊनच बघावं लागेल!

बी. एस. सी. अॅग्री केलेल्या महत्त्वाकांक्षी राजवर्धनला लग्नासाठी कोणकोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं, त्याला नवरी मिळते की नाही, याची कथा या चित्रपटातून बघायला मिळणार आहे.

नवरदेव चित्रपटाचे दिग्दर्शक राम खाटमोडे यांनी अगदी योग्य पद्धतीने भाष्य करत हा विषय किती महत्त्वाचा आहे हे दाखवून दिले आहे. तर काही दिवसांपूर्वी रिलीज झालेलं या चित्रपटातील 'लाल चिखल' हे रॅप नेटकऱ्यांनी डोक्यावर घेतलं! याचे शब्द आणि लय ही मनाला पिळवटून टाकणारी आहे.

अभिनेता क्षितीश दाते या चित्रपटात तरूण शेतकऱ्याच्या भूमिकेत दिसेल, त्यासोबतच प्रविण तरडे, प्रियदर्शिनी इंदलकर, मकरंद अनासपुरे, गार्गी फुले, रमेश परदेशी, हार्दिक जोशी, नेहा शितोळे, संदीप पाठक, तानाजी गळगुंडे, विनोद वणवे अशा उत्तम कलाकारांची मांदियाळी या चित्रपटात पाहायला मिळेल. हा चित्रपट २६ जानेवारीला महाराष्ट्रभरात प्रदर्शित होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com