नवीना-करण रेशीमगाठीत 

वृत्तसंस्था
सोमवार, 6 मार्च 2017

"मिले जब हम तुम'मधील "दिया' आठवतेय का? तिच्या फंकी स्टाईलसाठी तेव्हा ती चर्चेत होती. त्यानंतर सध्याच्या "इशकबाज' या मालिकेतील "टिया' म्हणून ती सगळ्यांच्या परिचयाची झाली आहे. ही मराठमोठी मुलगी नवीना बोले नुकतीच प्रियकर करण जीतशी विवाहबंधनात अडकली आहे. तिचे लग्न मराठी आणि गुजराती अशा दोन्ही पद्धतीने थाटात झाले. करण आणि नवीनाची वर्षभरापूर्वी जीममध्ये भेट झाली होती. तिथेच त्यांची मैत्री झाली. पुढे मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. हे दोघे हनिमूनसाठी थायलंडला जाणार आहेत. तेथूनच परतल्यानंतर ते आपापल्या कामात बिझी होतील. 

Web Title: Navina Bole aka Tia from 'Ishqbaaz' ties the knot with boyfriend Karan Jeet!