Amitabh Bachchan च्या नातीनं शहराच्या लक्झुरियस लाइफकडे फिरवली पाठ.. गावाकडं गेली अन् चक्क.. व्हिडीओ पाहून जो-तो थक्क

अमिताभ यांच्या मुलीची मुलगी म्हणजे नव्या नवेली नंदा ही एक बिझनेस वूमन आहे. सोशल मीडियावर सध्या तिचा एक व्हिडीओ भलताच व्हायरल होतोय.
Navya Naveli Nanda in Village Video Viral
Navya Naveli Nanda in Village Video ViralInstagram

Amitabh Bachchan यांची नात नव्या नवेली नंदा सोशल मीडियावर भलतीच सक्रिय असते. ती आपल्या आजोबा-आजी किंवा मामा-मामी म्हणजे अभिषेक-ऐश्वर्यासारखी अॅक्टर तर नाही पण तरिही एक बिझनेस वूमन बनून ती लोकांचे मन जिंकते. नव्या 'आरा हेल्थ' या कंपनीची को-फाउंडर आहे. ही कंपनी स्त्रीयांच्या आरोग्यासंदर्भात काम करते.

आपला बिझनेस आणि फोटोशूटविषयी सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या नव्यानं अलिकडेच ट्रॅक्टर चालवतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. लक्झुरियस लाइफ जगणाऱ्या नव्याला गावाकडच्या लोकांमध्ये इतकं प्रेमानं वागताना आणि गावाकडच्या संस्कृतीत मिसळलेलं पाहून सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी तिची प्रशंसा केली आहे.(Navya Naveli Nanda in Village Video Viral)

Navya Naveli Nanda in Village Video Viral
Satish Kaushik यांची हत्या झाली म्हणणारी महिला अडचणीत.. कोर्टानं तिचाच डाव तिच्यावरच उलटवला.. 15 जूनला होणार निर्णय

नव्या काही दिवसांपूर्वी गुजरातच्या एका गावात गेली होती. तिथे जाऊन तिथल्या स्थानिक लोकांच्या भेटीगाठी केल्या. पण इथवर थांबेल ती नव्या कुठली..अभिनेत्रीनं झाडाखाली बसून लोकांसोबत खूप गप्पा मारल्या आणि चांगला वेळ घालवला. नव्यानं ट्रॅक्टर देखील चालवला. बिग बी यांची नात असूनही नव्यानं इतक्या साधेपणानं गावकऱ्यांसोबत वेळ घालवला तो तिचा अंदाज पाहून नेटकरी मात्र भलतेच खूश झाले आहेत. कुणी तिच्या नम्र स्वभावाची प्रशंसा केली आहे तर कुणी तिला ट्रॅक्टर चालवताना पाहून तिच्या ड्रायव्हिंग स्किलची प्रशंसा केलीय तर कुणी तिचं डेअरिंग पाहून हैराण झालंय.

नव्याच्या या व्हिडीओवर एका नेटकऱ्यानं कमेंट करत लिहिलं आहे की,'ज्या पद्धतीनं तू लोकांना पाठिंबा देतेस ते खरंच वाखाणण्यासारखा आहे'.

आणखी एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की,'तु सगळ्यात खास आणि वेगळी स्टार किड्स आहेस'.

नव्याच्या एका चाहत्यानं लिहिलं आहे की,'नव्या गोष्टींना शिकण्याची तुझी आवड पाहून चांगलं वाटलं. माझ्या शुभेच्छा तुझ्यासोबत कायम आहेत'.

माहितीसाठी सांगतो की नव्यानं एक पॉडकास्टही सुरु केला होता,ज्यामध्ये तिनं जया बच्चन आणि श्वेता बच्चन या आपल्या आजी आणि आईकडून बच्चन कुटुंबियांच्या अनेक लोकांना माहित नसलेल्या गोष्टी जाणून घेतल्या. पॉडकास्टचा हा प्रवास आता संपला आहे पण चाहत्यांनी तिच्या होस्टिंग स्टाइलला आणि आत्मविश्वासाला खूप पसंत केलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com