नवाजुद्दीनला माजी प्रेयसीने झापले!

रविवार, 29 ऑक्टोबर 2017

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता नवाजुद्दीन सद्दीकी सतत चर्चेत आहे. तो आपल्या चित्रपटातून आपली प्रतिभा दाखवतो आहेच. शिवाय तो आता आपलं चरित्र प्रकाशित करतो आहे. त्याचं नाव आहे अ आॅर्डिनरी लाईफ-अ ममोअर'. हे पुस्तक आल्यानंतर अनेक मंडळी माझ्यावर चिडतील असा दावाा त्याने केला होता. तसंच झालं आहे. पण हा पहिला स्फोट झाला आहे तो त्याच्या माजी प्रेयसीचा. या पुस्तकात नवाजने लिहिलेल्या अनेक गोष्टी काल्पनिक असल्याचा दावा तिने केला आहे. 

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अभिनेता नवाजुद्दीन सद्दीकी सतत चर्चेत आहे. तो आपल्या चित्रपटातून आपली प्रतिभा दाखवतो आहेच. शिवाय तो आता आपलं चरित्र प्रकाशित करतो आहे. त्याचं नाव आहे अ आॅर्डिनरी लाईफ-अ ममोअर'. हे पुस्तक आल्यानंतर अनेक मंडळी माझ्यावर चिडतील असा दावाा त्याने केला होता. तसंच झालं आहे. पण हा पहिला स्फोट झाला आहे तो त्याच्या माजी प्रेयसीचा. या पुस्तकात नवाजने लिहिलेल्या अनेक गोष्टी काल्पनिक असल्याचा दावा तिने केला आहे. 

सुनीता असं तिचं नाव आहे. ती म्हणजे या पुस्तकात नवाजुद्दीनने माझ्याबद्दल लिहिले आहे. त्यातल्या अनेक गोष्टी त्याने स्वरचित लिहिल्या आहेत. आमच्या दरम्यान असं काहीही झालं नव्हतं. ही अत्यंत चुकीची बाब आहे. नवाजुद्दीनला बोलताना ती म्हणते, 'आमच्या दरम्यान असं काहीही झालं नव्हतं. मी त्याला सोडलं हे खरंय, पण नवाज मी तुला तू गरीब आहेस म्हणून सोडलं नव्हतं. तर तुझे विचार अत्यंत हीन दर्जाचे आहे, म्हणून मी तुला सोडलं.' नवाजुद्दीननने लिहिलेल्या पुस्तकातल्या अनेक गोष्टींचा संदर्भ सुनीताने आपल्या फेसबुक वाॅलवर दिला आहे. नवाजुद्दीनने म्हटल्यानुसार मी आणि सुनीता कधी एनएसडीमध्ये भेटलोच नाही. त्यावर ती म्हणते, मी एनएसडीमध्ये आले तेव्हा नवाज माझ्यापेक्षा एक वर्ष सीनिअर होता. त्यामुळे हे नक्की आहे की आम्ही एनएसडीमध्ये भेटलो. त्यावेळी आमच्यात असं काही रिलेशन नव्हतं हेही तितकंच खरं आहे. पण आमची भेट तिथेच झाली होती. नवाजने या पुस्तकात असंही म्हटलं आहे, की सुनीताने आम्ही रहायचो त्या खोलीत आमच्या नावाचा बदाम काढला होता. त्यात बाणही होता. आमचं ब्रेकअप झाल्यावर मी पांढऱ्या रंगाने ते सर्व पुसून टाकंल. मला तिला आणि या चित्राला माझ्या मनातून काढून टाकायचं होतं. यावर सुनीता म्हणते, आमप एनएसडीत भेटलो. मी काही चित्रकला वा शिल्पकलेचा क्लास घ्यायला आले नव्हते. हा सर्व प्रकार चुकीचा आहे. 

सुनीता राजावरने लिहिलेल्या या पोस्टनुसार, नवाजला सतत सहानुभूती हवी असायची. पैसे, ग्लॅमर, रंग यावरून त्याला सतत कुणीतरी सांभाळून घेणारं हवं असायचं. तो म्हणतो, की तो गरीब होता म्हणून मी त्याला सोडलं. पण तसं नाहीय उलट त्याच्यापेक्षा माझी स्थिती गंभीर होती. त्याला स्वत:चं घर होतं. मी तर मैत्रिणीकडे रहायचे. तो गरीब होता म्हणून मी त्याला सोडलं नाही. तर त्याचे विचार दरिद्री होते. काही काळानंतर मला कळलं की आमच्यात रिलेशनशिप असताना जे काही महत्वाचे अत्यंत खासगी क्षण आम्ही घालवले, त्याचीही तो मित्रांसबोत टिंगल करत असे. 

सुनीताच्या या वक्तव्यामुळे नवाजुद्दीनचं हे चरित्र पुन्हा चर्चेत आलं आहे. आता यावर हा अभिनेता काय प्रतिक्रीया देतो ते अद्याप कळलेलं नही.  

Web Title: nawazuddin siddiqi new book esakal news