नवाजुद्दीनचं भूमिकाप्रेम 

वृत्तसंस्था
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

"रईस'मधील नवाजुद्दीन सिद्दिकीच्या भूमिकेची सगळीकडून खूप तारीफ झाली. आता तो आपला संपूर्ण वेळ बायोपिक चित्रपटाच्या तयारीसाठी देणारेय. नंदिता दास दिग्दर्शित उर्दूतील प्रसिद्ध लेखक सआदत हसन मंटो यांच्या बायोपिकमध्ये नवाजुद्दीन मंटोची भूमिका साकारणार आहे. रुपेरी पडद्यावर मंटोंची भूमिका साकारण्यासाठी नवाजने विशेष योजना आखलीय. नवाज सध्या मंटो यांच्यासारखं जीवन जगण्याचा प्रयत्न करतोय. याविषयी तो म्हणाला, "नंदिता दास यांच्या रिसर्चमुळे मी मंटो यांना खूप चांगल्या प्रकारे समजू शकलो. ही भूमिका तंतोतंत साकारण्यासाठी मी त्यांच्यासारखे कपडे घालतोय. त्यांच्यासारखं खाणं, बोलणं, चालण व फिरणं या सर्व गोष्टींचा सराव करतोय.' थोडक्‍यात मंटो यांना जास्तीत जास्त समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. या बायोपिकच्या शूटिंगला मार्चमध्ये मुंबईत सुरुवात होणार आहे. 

Web Title: nawazuddin siddiqui character love